Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अनेकांचा जीव वाचवणा-या तुरुंग अधीक्षकाचे कोरोनाने निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

अनेकांचा जीव वाचवणा-या तुरुंग अधीक्षकाचे कोरोनाने निधन

Surajya Digital
Last updated: 2020/11/04 at 8:34 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बीड : बीड जिल्हा कारागृहात तब्बल 65 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. जीवाची बाजी लावून कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांनी सगळ्याच कैद्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं होतं. मात्र, कोरोनामुळे कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचं कोरोनामुळे निधन झालं. बीडमध्ये कारागृहाच्या सुरक्षेसह संजय कांबळे यांनी विविध सामाजिक उपक्रमांतही पुढाकार घेतला होता. त्याचा मोठा मित्र परिवारही आहे. अशा अधिका-याचा कोरोनाने बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर संजय कांबळे यांच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शहरातील लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी ते उपचार करून घरी परतले असता संजय कांबळे यांची बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. ते एक उत्तम साहित्यिकही होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

संजय कांबळे मुंबई असताना मुंबई बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी अजमल कसाब याची सुरक्षा व्यवस्था त्यांच्या नियंत्रणात होती. ही मोठी जबाबदारी त्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळली होती. मुंबईनंतर मागील काही महिन्यापासून ते बीड येथे जिल्हा कारागृहाचे अधिक्षक म्हणून काम पाहत होते. शिवाय अभिनेता संजय दत्त याच्या सेलचे ते प्रमुख राहिले होते.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्याचा बीड जिल्ह्यातही फैलाव झाला होता. सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी बीड कारागृहातील 50 हून अधिक कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती कारगृह अधीक्षक संजय कांबळे यांनी एखाद्या कोरोना यौद्धासारखी हाताळली होती. व्यवस्थीत नियोजन करून संजय कांबळे यांनी सगळ्याच कैद्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं होतं. मात्र, संजय कांबळे यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #कोरोना #बीड #जिल्हाकारागृह #तुरुंगअधीक्षक #संजयकांबळे #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगलीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना; 13 दिवसाच्या बालकाचा निर्दयीपणे खून
Next Article कारवाईवेळी महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा अर्णव गोस्वामींवर गुन्हा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?