Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अर्णब गोस्वामींची न्यायालयीन कोठडीत रवानगी; कोर्टात पत्नीस न्यायालयाची तंबी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

अर्णब गोस्वामींची न्यायालयीन कोठडीत रवानगी; कोर्टात पत्नीस न्यायालयाची तंबी

Surajya Digital
Last updated: 2020/11/05 at 12:24 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ, पत्रकार अर्णब गोस्वामी यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अलिबाग कोर्टाकडून अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयांनी कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. आज सकाळी अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली.

गोस्वामी यांच्यासह इतर २ आरोपींनासुद्धा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फोरोज शेख आणि नितेश सारडा अशी इतर दोन आरोपींची नावं आहेत.

दरम्यान तिनही आरोपींनी त्यांना जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आपलं म्हणण मांडण्यासाठी कोर्टानं पोलिसांना वेळ दिलेला आहे. पण, कोर्टानं जामीन अर्जावरील सुनावणीसाठी निश्चित तारीख दिलेली नाही, आरोपींचे वकली सुशील पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

‘अ समरी’ रिपोर्ट मान्य झाल्यावर पुन्हा केसचा तपास करण्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेतली नाही, पोलिसांवर असा ठपका ठेवत कोर्टानं पोलिसांना अर्णब गोस्वामी यांची पोलीस कोठडी नाकारली आहे.

अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू या घटनेशी आरोपींचा थेट संबंध प्रस्तापित व्हायला हवा, तो पोलिसांना करता आला नाही. तसंच आरोपींची पोलीस कोठडी घेण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे, असं म्हणत कोर्टानं पोलिसांना कोठडी देण्यास नकार दिला आहे.

अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी  रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना अलीबागच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान आज बुधवारी सकाळी अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या सरकारी कामात अडथळा घातल्याप्रकरणी त्यांच्यावर ३५३ कलमांतर्गत आणखी एक FIR दाखल करण्यात आली आहे.

आज सकाळी अर्णब गोस्वामी यांना अटक झाली तेंव्हा धक्काबुक्की झाल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला. त्यामध्ये त्यांना हाताला आणि पाठीला दुखापत झाल्याचे देखील म्हंटले. त्याबाबत पोलिसांकडून काही व्हिडीओ स्वरूपातील पुरावे देखील सादर करण्यात आले. दरम्यान कोर्टाने अर्णब यांचा दावा फेटाळून लावल्याची माहिती आहे.

* अर्णव गोस्वामींच्या पत्नीस तंबी

अर्णब गोवामी यांच्या पत्नी यांनी देखील कोर्टामध्ये मोबाईलचं रेकॉर्डिंग सुरु ठेवलं होतं अशी माहिती टीव्ही रिपोर्टमधून समोर येते. काही माध्यमांना अक्षरा नाईक यांचे वकील विलास नाईक यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. त्यांच्या माहितीनुसार कोर्टात सुनावणी सुरु असताना अर्णब यांच्या पत्नी यांनी कोर्टात आपला मोबाईल सुरु ठेवून रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता. यावर न्यायाधीशांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि असा प्रकार पुन्हा होऊ नये अशी देखील त्यांना तंबी दिलेली आहे.

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांची दुसऱ्यांदा मेडिकल टेस्ट केल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता कोर्टात पुन्हा सुनावणीला सुरवात केली गेली. आता अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #अर्णवगोस्वामी #न्यायालयीन #कोठडीत #रवानगी #पत्नीस #तंबी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उद्या सोलापुरात रास्तारोको आंदोलन
Next Article अहमदाबाद केमिकल गोदामातील स्फोटातील मृतांची संख्या १२ वर गेली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?