अहमदाबाद : अहमदाबाद शहराच्या एमआयडीसी परिसरात असणाऱ्या केमिकलच्या गोदामात बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास भीषण स्फोट झाला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. मृतांमध्ये ५ महिलांचा समावेश असून यामध्ये अनेकजण जखमी झाले होते. स्फोटानंतर गोदामाची भिंत ढासळली. ढासळेलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक मजूर गाडले गेले होते. अग्निशमन दलाकडून दिवसभर बचावाचे कार्य चालू होते. आता यात मृतांची संख्या १२ वर पोहचली आहे.
या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान यांनी ट्विट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. या घटनेमुळे मी व्यथित झालो असल्याचे म्हणाले. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या गोदामात केमिकलेने भरलेले ड्रम ठेवण्यात आले होते. येथे स्फोट होऊन गोदामाची भिंत पडली आणि शेजारील कपड्याच्या गोदामात आग लागली. या कपड्याच्या गोदामात अनेक मजूर कपडे पॅकींग करण्याचे काम करीत होते. स्फोटामुळे तसेच पडलेल्या भिंतीत गाडले गेल्यामुळे १२ जणांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल बजाव मोहीम सुरु केली. अर्धा तासच्या आत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान शोध मोहीम व बचाव कार्यास तब्बल ९ तासांचा कालावधी लागला. यावेळी ढिगाऱ्या घालून १२ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच काही जखमींना वाचविण्यात यश आले आहे. अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी पासून एनडीआरएफच्या टीमनेही बचावकार्य मोहिमेत सहभाग घेतला.