पंढरपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उद्या शनिवारी पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा निघणार आहे. माञ कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी राञी बारा वाजल्यापासून शनिवारी राञी बारा वाजेपर्यंत पंढरपूरला येणारे सर्व बस बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. यामुळे अगोदरच तोट्यात असलेल्या परिवहन महामंडळाला आणखी तोटा सहन करावा लागत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बस सेवा बंद झाल्याने पंढरपूर आगारातील २५० व राज्यभरातील सर्व आगारातील ३५० बसच्या फे-या रद्द झाल्या आहेत. यामुळे पंढरपूर आगाराचे दररोज पाच लाख व इतर आगारांचे दररोज दहा लाखाचे नुकसान झाल्याची माहिती आगारप्रमुख सुधीर सुतार यांनी दिली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले असून जादा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.