नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. तसंच उपराष्ट्राध्यक्ष निवड झाल्याबद्दल भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनाही मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. बायडन-हॅरीस प्रशासनासह भारत-अमेरिका संबंध नवीन उंची गाठतील, अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या ४६ व्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन हे निवडून आलेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. ‘भव्य विजयाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भारत-अमेरिका संबंधांसाठी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी दिलेलं योगदान कौतुकास्पद होतं. आता तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाल्याने भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर काम करण्यात आनंद होईल’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान मोदींनी आणखी एक ट्विट केलं. उपराष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचं अभिनंदन केले. ‘तुमचं यश प्रेरणादायक आहे. हा केवळ आपल्या नातलगांसाठीच नव्हे तर सर्व भारतीय-अमेरिकेच्या जनतेसाठी अभिमानाचा क्षण आहे. मला आशा आहे की भारत-अमेरिका संबंध तुमच्या नेतृत्वात आणि सहकार्याने नवीन उंची गाठतील’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
* अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब
दरम्यान, अमेरिकेतील निवडणुकांत मोठ्या प्रमाणात झालेल्या टपाली मतदानाची मोजणी सुरू असून ती पूर्ण झाल्याखेरीज अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागला, असे समजले जाऊ नये, असे ट्रम्प यांचे म्हणणे होते. मात्र, बायडेन यांनी घेतलेल्या आघाडीमुळे तेच अध्यक्ष होतील, अशी चिन्हे दिसून येते होती. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्षांना जी सुरक्षाव्यवस्था पुरवली जाते, तशी सुरक्षा बायडेन यांना देण्यासाठी सिक्रेट सर्व्हिसच्या अतिरिक्त तुकड्या डेलावेअरला रवानाही झाल्या आहेत. आता, बायडन यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे, उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरीस यांची वर्णी लागणार आहे.