Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोना : साखरपुडा मोडल्याने आयुष्यभर ब्रम्हचारी राहणा-या पाटलांनी केले 66 व्या वर्षी लग्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

कोरोना : साखरपुडा मोडल्याने आयुष्यभर ब्रम्हचारी राहणा-या पाटलांनी केले 66 व्या वर्षी लग्न

Surajya Digital
Last updated: 2020/11/08 at 9:56 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : तरुणपणी साखरपुडा मोडला म्हणून आयुष्यभर लग्न न करता ब्रम्हचारी राहिलेल्या माधव पाटील नावाच्या पत्रकाराने अखेर 66 व्या वर्षी लग्न केलं. आयुष्यभर लग्न कर म्हणून मागे लागलेल्या नातलगांचे न ऐकता आपल्या निर्णयावर ठाम राहिलेल्या माधव पाटील यांचे कोरोनाने डोळे उघडले. फक्त स्वतःचाच विचार न करता अर्धांगिनीच्या कुटुंबालाही माधव पाटील यांनी न्याय दिला आहे.

सोशल मीडियावर सध्या टिकेचे, टिंगल-टवाळीचे, मजाक-मस्तीचे कारण झालेल्या माधव पाटील आणि संजना पाटील यांना त्याची परवा नाही. समाजासाठी 35-40 वर्ष खर्च करून पत्रकारीता, समाजकारण, राजकारण करून शेवटी पदरात टिकाच पडत असेल तर ती झेलायला समर्थ असल्याचे माधव पाटील सांगतात.

गेल्या महिनाभरापासून ज्या आजोबांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांची टिंगल टवाळीही केली जात आहे. शेरोशायरी करून लग्न केलेल्या आजोबांची टर उडवली जात आहे. त्या आजोबांच्या वयाच्या असलेल्या माधव पाटील यांना भेटण्याचा प्रयत्न एका वृत्तवाहिनीने केला. उरण तालुक्यातील बामणडोंगरी गावात राहणारे माधव पाटील गेल्या 35 वर्षांपासून पत्रकारिता करतात. रायगड मधील ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, म्हातारपणी लग्न केल्यामुळे ते आणखीचं प्रसिद्ध होत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आयुष्यभर लग्नच न करणाऱ्या माधव पाटलांनी वयाच्या 66 व्या वर्षी का लग्न केले असेल, याबाबत आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माधव पाटील यांचे वयाच्या तिशीत लग्न ठरले होते. साखरपुढाही वाजत गाजत झाला होता. मात्र, कुठेतरी माशी शिंकली आणि झालेला साखरपुढा मोडला. यानंतर मात्र लग्न या व्यवस्थेवरील विश्वास उडालेल्या माधव पाटील यांनी लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. वय वाढत होतं, घरात एकूलता एक मुलगा होता. घरात सूनबाई येईल, कामाला हातभार लागेल, खानदानाला वारस मिळेल, अशा सर्व प्रकारे माधव पाटलांना सांगूनही ते लग्नासाठी राजी झाले नाहीत. अखेर कोरोनाने माधव पाटलांचे डोळे उघडले.

* …म्हणून या वयात बोहल्यावर

घरात गेली 7 महिने काढणाऱ्या माधव पाटलांना एकांत खाऊ लागला. सहचारीनी असावी अशी भावना त्यांना जाणवू लागली. आईचे वय 88 वर्ष, स्वतःचे वय 66 वर्ष. त्यामुळे घरात सांभाळणारे कोणीतरी असावे. याची जाणीव झाली. यामुळे अखेर माधव पाटील यांनी 66व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संजना यांच्याशी पहिलेच लग्न झाले असले तरी संजना यांचे दुसरे लग्न आहे. घटस्पोटीत असलेल्या संजना यांचे वय 45 असून त्यांच्या माहेरी भावाचे कोरोनाने निधन झाल्याने आधार हारपला होता. त्यांनाही उतार वयात आधाराची गरज असल्याने आपल्या पेक्षा 20 वर्ष वयाने मोठ्या असलेल्या माधव पाटील यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आजोबांच्या वयातील व्यक्तीशी लग्न का करतेस याबाबत त्यांना नातेवाईक, मित्रमंडळी यांनी हिनवले. पण त्यांनी याची परवा न करता उतार वयात साथ देण्यासाठी लग्नगाठ बांधली.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #साखरपुडा #मोडल्याने #ब्रम्हचारी #कोरोना #एकांत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अर्णव गोस्वामींची तळोजा कारागृहात रवानगी; कारागृहातील मुक्काम वाढला
Next Article नोकरी गेली, अर्ज करा आणि बेरोजगार भत्ता मिळवा; 40 लाख औद्योगिक कामगारांना फायदा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?