मुंबई : रिपब्लीक टिव्हीचे मालक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रासह केंद्रातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामीला अटक करुन तळोजा कारागृहात ठेवलं आहे. या प्रकरणी राज्यातील भाजपा नेते अर्णब यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत.
भाजपाचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी अर्णब गोस्वामी याला भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जाण्याची तयारी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान देत हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अर्णव यांच्या जिवाला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर महाविकास आघाडी सरकार यासाठी जबाबदार राहिलं असं राम कदम यांनी ट्विट करुन म्हटलं आहे. दरम्यान आज दुपारी तीन वाजता अर्णव गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे
* उपोषणानंतर आता पदयात्रा
अर्णवची सुटका व्हावी म्हणून उपोषण करणारे भाजपचे आमदार राम कदम आता अर्णव यांच्या सुटकेसाठी थेट सिद्धिविनायकाला साकडे घालणार आहेत. राम कदम हे घाटकोपर येथील त्यांच्या निवासस्थानापासून ते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा करणार असून अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचं कदम यांनी म्हटलं आहे.अर्णब यांना करण्यात आलेली अटक चुकीची आहे. त्याचा आम्ही भाजप विरोध करत असल्याचे ठामपणे सांगितले.