पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक २०२० ची मतमोजणी सुरू आहे. अधिकृत घोषणा झाली नाही. परंतु, मतदारांचा कौल मात्र एव्हाना स्पष्टपणे समोर आलाय. यामध्ये एनडीएनं बहुमताचा आकडा सहज गाठल्याचं दिसून येतंय.
याच दरम्यान, स्वयंघोषित मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार, ब्लॅक लेडी म्हणून ओळख निर्माण झालेल्या प्लुरल्स पक्षाच्या अध्यक्ष पुष्पम प्रिया चौधरी यांना मोठा धक्का बसलाय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुष्पम प्रिया या बिस्फी आणि बांकीपूर या दोन विधानसभा मतदार संघातून निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. दोन्ही जागेवर पुष्पम प्रिया पिछाडीवर आहेत. उल्लेखनीय म्हणजे, मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायाला पुष्पम प्रिया यांच्यापेक्षा तिप्पटीनं अधिक मतं दिल्याचंही दिसून येतंय.
* मतं चोरी झाल्याचा दावा
मतांचा कल हाती आल्यानंतर पुष्पम प्रिया यांनी सोशल मीडियावरून ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा केलाय. मतदारांनी प्लुरल्स पक्षाला दिलेली मतंही एनडीएला ट्रान्सफर झाल्याचा दावा पुष्पम प्रिया यांनी केलाय. बुथच्या डाटाच्या आधारावर प्लुरल्सची मतं चोरी झाल्याचा दावा पुष्पम प्रिया यांनी केलाय.