नंदुरबार : धुळे-नंदुरबार विधान परिषद (स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ) निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे अमरीश पटेल यांनी राजीनामा दिल्याने जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर निवडणूक होणार होती. मात्र, कोरोनामुळे ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती. अखेर निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
१ डिसेंबरला धुळे-नंदुरबार विधान परिषदेची पोटनिवडणूक होणार आहे. एका जागेसाठी २ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अमरीश पटेल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजपकडून अमरीश पटेल ही निवडणूक लढवणार आहेत. तर काँग्रेसकडून अभिजीत पाटील रिंगणात आहेत. १ डिसेंबरला मतदान होणार आहे तर ३ डिसेंबर रोजी होणार मतमोजणी होणार आहे.