Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कार – ट्रकचा भीषण अपघात, सहा चिमुकल्यांसह 14 जणांचा जागीच मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

कार – ट्रकचा भीषण अपघात, सहा चिमुकल्यांसह 14 जणांचा जागीच मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/11/20 at 9:12 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लखनौ : वरातीहून घरी निघालेल्या कुटुंबियांवर काळानं घाला घातला. भरधाव बोलेरो आणि ट्रक यांच्यात भीषण धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की बोलेरो ट्रकच्या पूर्ण खाली गेली होती. या गाडीचा चुराडा झाला होता. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

नबाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेखपूर गावात विवाह सोहळ्याला सर्वजण उपस्थित होते. तिथून पुन्हा घरी मिरवणूक संपवून येत असताना काळानं घाला घातला. या अपघातामध्ये सहा चिमुकल्यासह तब्बल 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रतापगडच्या माणिकपूर पोलीस ठाण्यातील देशराज इनारा येथे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

रात्री उशिरा परतत असताना बोलेरो कारची रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला धडक बसली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार चालकाला झोप आल्याने गाडीवरचे नियंत्रण सुटलं आणि अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कारमधील सगळे लग्न समारंभातून घरी परतत होते. यावेळी अपघात झाल्याने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 6 बालकांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी 2 तास लागले. अपघातातील मृतांमध्ये 12 जण हे कुंडा कोतवालीच्या जिगरापूर चौसा गावातील आहेत. तर बोलेरो कार चालकासह दोन जण हे कुंडा परिसरातील राहणारे आहे. बाकी इतर गावातीलही प्रवासी गाडीमध्ये होते.

पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेहांना ताब्यात घेतलं असून शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. यावर पोलीस अधिक तपास करत असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हा अपघात खूप भीषण होता. बोलेरो कार ट्रकच्या खाली गेली होती आणि चुराडाही झाला होता. त्यामुळे ही कार क्रेनच्या मदतीनं बाहेर काढावी लागली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #उत्तरप्रदेश #कारट्रकचा #भीषणअपघात #सहाचिमुकल्यांसह #14जणांचा #जागीचमृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्षय कुमारने फेकन्यूज पसरवल्याबद्दल दाखल केला ५०० कोटींचा मानहानीचा खटला
Next Article लसीची खात्री नाही, पण कोरोना लस 500 रुपयात मिळणार

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?