Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लोणावळ्यातील अपघातात सोलापूरच्या कांदा व्यापा-याचा मृत्यू तर एक जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरगुन्हेगारी

लोणावळ्यातील अपघातात सोलापूरच्या कांदा व्यापा-याचा मृत्यू तर एक जखमी

Surajya Digital
Last updated: 2020/11/21 at 9:34 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळा येथे झालेल्या भीषण अपघातात बार्शीतील प्रसिद्ध कांदा व्यापारी लखन सावळा शिंदे (वय ३३ रा. राऊत चाळ बार्शी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बप्पा उर्फ जॉनी जानराव (वय ४८ वर्ष रा. जामगाव रोड बार्शी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तळेगाव दाभाडे येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की मयत लखन शिंदे हे मुंबईत भाऊबीज करून स्वतःच्या खाजगी वाहनाने बार्शी कडे परत निघाले होते. लोणावळ्या जवळ हायवेवर गाडीतून खाली उतरले असता अज्ञात वाहनांच्या धडकेने गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि जागीच ठार झाले. तर जानराव यांच्या पायाला गंभीर इजा झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लखन शिंदे हे बार्शीतील कांद्याचे प्रसिद्ध आडत व्यापारी होते. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यात ही त्यांचा मोठा व्यापार होता. तसेच शिवभीम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष होते. याशिवाय त्यांचा बार्शीतील विविध सामाजिक कार्यात सहभाग असायचा त्यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. लखन हा कांद्याच्या व्यापारासाठी प्रसिध्द होता. समाजकारण तसेच राजकारणातही सक्रीय होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. मित्रपरिवार मोठा होता. त्यामुळे त्याच्या अपघाती मृत्यूचे वृत्त येताच सर्वांना जबर धक्का बसला. रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी, भाऊ बहिणी असा परिवार आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #लोणावळ्यातील #अपघातात #सोलापूरच्या #कांदाव्यापा-याचा #मृत्यू #एकजखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कार्तिकी एकादशीला दिंड्यांना परवानगी नाहीच, दिंड्या मार्गस्थ होणार नाहीत
Next Article ‘स्नॅक व्हिडिओ’ ॲपवर बंदी घालण्याची मागणी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?