मुंबई : धडाकेबाज महिला आयपीएस अधिकारी डी. रुपा मुद्गल या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. दिवाळीत फटाके उडवण्यावरुन त्यांनी केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. या वादामध्ये अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील उडी घेतली. कंगनाने डी. रुपा यांना पोलीस विभागावर डाग असल्याचे म्हणत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. मात्र यावेळी रुपा मुद्गल यांच्यावर टीका करताना कंगनाने आरक्षणासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
रुपा यांच्यासारखे अधिकारी हे आरक्षणामुळे एवढ्या मोठ्या पदावर पोहचतात असा टोला कंगनाने ट्विटवरुन लगावला आहे. जेव्हा एखाद्या अयोग्य आणि लायक नसणाऱ्या व्यक्तीला पद मिळते तेव्हा त्यांच्याकडून त्रास दिला जातो. हे आरक्षणाचे दुष्परिणाम आहेत, असं कंगना रुपा यांच्याबद्दल बोलताना म्हटली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच मला रुपा यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती नाहीय मात्र मला खात्री आहे ती त्यांचा हा संताप त्याच्यातील अकार्यक्षमतेमुळे निर्माण झालेला आहे, असंही कंगनाने म्हटलं आहे. कंगनाच्या या वक्तव्याखालील कमेंट्समध्ये तिचे समर्थन करणारे आणि या वक्तव्याचा विरोध करणारे असे दोन्ही बाजूकडील समर्थक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
डी. रुपा या सध्या कर्नाटकच्या गृहसचिवपदी नियुक्त आहेत. डी. रुपा या कर्नाटकच्या दावनगेरे येथील रहिवासी आहेत. त्यांनी कर्नाटकमधूनच आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि युपीएसईची तयारी सुरु केली. सन २००० मध्ये डी. रुपा भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि आयपीएस क्षेत्र निवडलं. ट्रेनिंगमध्ये चांगली रँक मिळाल्याने त्यांना कर्नाटक केडरच मिळालं. डी. रुपा यांची छोटी बहिण आयआरएस अधिकारी आहे. सन २००३ मध्ये डी. रुपा यांनी मुनीष मुद्गल यांच्याशी लग्न केलं. मुनीष आएएस अधिकारी आहेत. दोघांना दोन मुलंही आहेत. त्या दोघांची नावं अनागा आणि रोषिल अशी आहेत.
* डी. रुपांना निलंबित करण्याची मागणी
डी. रुपा यांनी दिवाळीमध्ये फटके फोडण्याचा विरोध दर्शवणारी पोस्ट आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन केली होती. यामध्ये त्यांनी फटाके फोडे हे हिंदू संस्कृतीचा भाग नसल्याचे म्हटले होते. यावरुनच त्यांना अनेकांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डी. रुपा यांनी ट्रोलर्सला जशाच तसं उत्तर दिल्यानंतर हे प्रकरण आणखीन तापलं. डी. रुपा यांनी केलेल्या तक्रारीवरुन काही हिंदुत्ववादी विचारसरणी असणारी अकाऊंट ट्विटरने बंद केल्याचा आरोप डी. रुपा यांच्या विरोधकांनी केला आहे. यावरुनच आता डी. रुपा यांना निलंबित करावे अशी मागणी केली जात आहे.