सोलापूर : ‘ तुम्ही ईडी लावाल तर आम्ही सीडी लावू’ म्हणताय. मग जरुर सीडी बाहेर काढा. कशाची वाट पाहताय? असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले.
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ काल मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी त्यांनी एकनाथ खडसेच्या सीडी विधानावर भाष्य केले. तसेच आमच्या सरकारच्या काळातील वीज मंडळाच्या कारभाराची चौकशी करणार, असाल तर खुशाल करा, असेही फडणवीस म्हणाले.
तुम्ही ईडी लावाल तर आम्ही तुमची सीडी दाखवू, असे आव्हान खडसेंनी फडणवीसांना दिले होते. या विधानाची आठवण करुन देताच फडणवीस म्हणाले, इडीने आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर रेड टाकली असेल तर त्यांच्याकडे निश्चित काहीतरी माहिती असेल. त्याशिवाय ते रेड टाकत नाही. मला याबद्दल फारशी माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. चूक झाली असेल तर एजन्सी कारवाई करेल.