सातारा : मेढा येथील डॉ. रमेश कदम यांच्या पत्नी नगरसेविका डॉ. प्राची कदम यांनी पुणे येथे आत्महत्या केली आहे. आज शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली. यामुळे मेढ्यात खळबळ उडाली आहे.
डॉ. प्राची कदम या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्या पती रमेश यांच्यासह मेढा येथे खाजगी हॉस्पिटल चालवतात. दोन वर्षापूर्वी त्यांना भाजपने मेढा नगर पंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अचानक केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी आत्महत्येमागचा कोणताही प्राथमिक अंदाज व्यक्त केला नाही.
गेल्या तीन महिन्यांपासून त्या पुणे येथे माहेरी गेल्या होत्या. त्यांच्या आत्महत्येचे अद्याप कारण समजू शकले नाही. याबाबत पुणे येथे कोणतीही तक्रार किंवा नोंद पोलिसांमध्ये झालेली नाही. नगरसेविका आणि डॉक्टरची आत्महत्या असल्याने कोणीही याविषयी बोलण्यास तयार नाही. पोलिस प्रशासनही सावध प्रतिक्रिया देत आहेत.