सोलापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधरच्या 62 व शिक्षक मतदारसंघातील 35 उमेदवारांसाठी सोलापूर शहर जिल्ह्यात आज मंगळवारी अत्यंत चुरशीने मतदान झाले. पदवीधरांसाठी 62.7 टक्के तर शिक्षकांसाठी 85.09 टक्के मतदान झाले आहे. दोन्ही मतदार संघाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. दरम्यान गुरुवारी ( ता. 3 ) पुण्यात मतमोजणी होणार आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी शहर जिल्ह्यातील 197 मतदान केंद्रावर मतदान उस्फूर्तपणे झाले. सकाळी आठ वाजल्यापासून शहरातील प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगाच रांगा लावल्या होत्या. कोरोनाच्या उपायोजना करीत प्रत्येक मतदाराचे थर्मल गनद्वारे तापमान तपासणी केली जात होती. सॅनिटायझर देऊन मतदान करण्यासाठी मतदारास केंद्रावर प्रवेश दिला जातो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मतदानाची आकडेवारी
पदवीधर मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण मतदान केंद्र 123 होती. या निवडणुकीत पुरुष पदवीधर मतदार 42 हजार 70 तर स्त्री पदवीधर मतदार संख्या 11 हजार 742 एवढी आहे. 27 हजार 170 पदवीधर पुरुषांनी तर 6 हजार 229 एवढ्या महिला पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. एकूण 33 हजार 399 मतदारांनी मतदान केले तर 62.7 टक्के मतदान झाले.
शिक्षक मतदारसंघात 74 मतदान केंद्रे होती. शिक्षक संख्या 13 हजार एवढी असून 9 हजार 225 पुरुष शिक्षकांनी मतदारांनी तर 2 हजार 371 महिला शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 11 हजार 558 एवढ्या शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदानाची टक्केवारी 85.9 टक्के एवढी आहे