Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मसालाकिंग महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन, टांगा ते पद्मभूषण पुरस्कार, खडतर प्रवास, सविस्तर वाचा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

मसालाकिंग महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन, टांगा ते पद्मभूषण पुरस्कार, खडतर प्रवास, सविस्तर वाचा

Surajya Digital
Last updated: 2020/12/03 at 8:18 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

नवी दिल्ली : देशातील नामांकित मसाला कंपनी महाशय दी हट्टी अर्थात एमडीएचचे प्रमुख पद्मभूषण महाशय धर्मपाल गुलाटी यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर माता चंदादेवी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्याच वर्षी धर्मपाल गुलाटी यांना व्यापार आणि खाद्यप्रक्रिया क्षेत्रातील उत्तम योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले.

पद्मभूषण धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाने आर्य समाजासह देशात शोक व्यक्त करण्यात येत आहे. धर्मपाल गुलाटी यांचे हृदयविकाराने निधन झाले. आज पहाटे ५.३९ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजारी असल्याने ते गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते.  धर्मपाल हे एक समाजसेवक देखील होते. त्यांनी अनेक शाळा आणि रुग्णालये देखील सुरू केली. करोना संसर्गाच्या काळात त्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ७५०० पीपीई किट देखील उपलब्ध केले होते.

भारत पाक फाळणीच्या वेळी तेथील हिंसाचार पाहून व्यथित झालेले गुलाटी सगळे सोडून भारतात आले आणि पाहता पाहता त्यांनी देशात आपले मसाल्याचे साम्राज्य उभारले. केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही त्यांची ओळख निर्माण झाली होती. गुलाटी यांना उद्योगात मिळालेले हे यश मात्र काही एका रात्रीत घडलेला चमत्कार नव्हता, तर त्यामागे अनेक वर्षांचे कठोर परिश्रम आणि तपश्‍चर्या होती.

* पाचवीपर्यंत शिक्षण, रक्तपाताने भारत गाठले

महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानातील सियालकोट येथे २७ मार्च १९२३ ला झाला होता.
केवळ पाचवी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. आता पाकिस्तानात असलेल्या सियालकोट येथे त्यांच्या पित्याचे महाशिया दी हट्टी नावाचे अर्थात एमडीएच हे मसाल्याचे दुकान होते. त्या काळी धर्मपाल गुलाटी या व्यवसायात पित्याला मदत करायचे. तेव्हाच त्यांनी शाळा सोडली.  1947 मध्ये फाळणी झाली. त्यावेळी मोठा हिंसाचार सुरू होता. त्या रक्तपाताने त्यांनी घायाळ केले. त्यांनी भारतात जाण्याचा निर्णय घेतला आणि ते केवळ 1500 रूपये घेउन दिल्लीत दाखल झाले. तत्पूर्वी त्यांना काही दिवस अमृतसरच्या शरणार्थी शिबिरातही राहावे लागले.

* दिल्लीच्या रस्त्यावर चालविला ‘टांगा’

सुरूवातीच्या दिवसांत दिल्लीत कुटुंबाचे पालन पोषण करण्यास अडचणी येत होते. त्यावेळी त्यांनी टांगा खरेदीचा निर्णय घेतला व दिल्लीच्या रस्त्यांवर तो चालवलाही. चुन्नीलाल आणि चानन देवी यांच्या पोटी त्यांनी 27 मार्च 1933 रोजी जन्म घेतला. जेव्हा त्यांनी टांगा विकत घेतला तेव्हा तो त्यांना चालवताही येत नसे, असे त्यांनीच त्यांच्या एका मुलाखतीत एकदा सांगितले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

टांगा चालवून काही पैसे गाठीशी जोडल्यानंतर दिल्लीच्याच करोल भाग परिसरात त्यांनी अजमल खां रस्त्यावर एक मसाल्याचे दुकान सुरू केले व त्यानंतर त्यांचा एक मसाला किंग बनण्याचा प्रवास सुरू झाला. आज केवळ भारतच नव्हे, तर जगाच्या काना कोपऱ्यातून त्यांच्या मसाल्याला मोठी मागणी आहे.

* वयाच्या 98 व्या वर्षीही तरतरीत

रोज सकाळी चार वाजता त्यांची दिनचर्या सुरू व्हायची. सुरूवातीला पंजाबी बिटसवर व्यायाम केल्यानंतर ते फलाहार घेत असत. त्यानंतर नेहरू पार्क येथे मॉर्निंग वॉक. दिवसभर केवळ पराठे आणि रात्रीच्या जेवणात मलई आणि दुधाचे पदार्थ. तत्पूर्वी सायंकाळी पुन्हा चालण्याचा व्यायाम असा त्यांचा नित्यक्रम होता. त्यामुळे वयाच्या 98 व्या वर्षीही ते तरूण आणि तरतरीत दिसायचे.

* पद्मभूषण किताबाचा गौरव

भारत सरकारने त्यांना पद्मभूषण किताब देउन त्यांचा गौरव केला होता. केवळ पंधराशे रूपयांत सुरू केलेला आपला मसाल्याचा व्यवसाय त्यांनी 2 हजार कोटींपर्यंत नेला आणि त्याच्या जाहीरातीत काम करून त्यांनी स्टारडमही मिळवले. त्यांना भेटण्यासाठी व त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अक्षरश: रांग लागायची. याचा त्यांना मनस्वी आनंद होता. लोकांचे प्रेम हेच आपले व्यसन असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

* पैसे वाचतील म्हणून केले स्वतःच्या जाहीरात काम

एमडीएचच्या जाहीरातीमुळे धर्मपाल गुलाटी घराघरांत पोहोचले. मात्र ही जाहीरात त्यांनी योगायोगानेच केली. त्याचे झाले असे की त्या जाहीरातील वधूच्या पित्याची भूमिका करणारा कलाकार वेळेत पोहोचू शकला नाही. तेव्हा दिग्दर्शकाने थेट गुलाटींनाच तुम्ही हे काम करणार का, असे विचारले. तेव्हा काही पैसे वाचतील म्हणून आपण ही जाहीरात व ती भूमिका केली असा किस्साही गुलाटी सांगतात. त्यांना प्रसिध्दीच्या झोतात राहण्याची हौसही होते, असे त्यांचे कार्यालय आणि एकूणच त्यांच्या राहणीमानावरून लक्षात येते व त्यामुळे ते चर्चेचाही विषय ठरले.

You Might Also Like

“राष्ट्रीय हितांवर कोणतीही तडजोड नाही” – जयशंकर यांचा अमेरिकेशी चर्चेसंदर्भात स्पष्टीकरण

अवकाश क्षेत्रात भारताची उल्लेखनीय प्रगती – पंतप्रधान मोदी

नांदेडमध्ये दुर्मिळ सापाच्या तस्करीत १ कोटी रुपयांचा माल जप्त; एक अटक

गणेशोत्सव काळात परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; अमित ठाकरे यांची शेलारांशी भेट

बिहारमध्ये ट्रक-ऑटो धडकीत ८ ठार; ५ गंभीर जखमी

TAGGED: #मसालाकिंग #महाशयधर्मपालगुलाटी #निधन #टांगातेपद्मभूषण #पुरस्कार #खडतरप्रवास #सविस्तरवाचा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेलारांच्या विधानाने उठलेल्या चर्चेवर पवारांची प्रतिक्रिया; सुप्रिया सुळेंना राज्यात रस नाही
Next Article महाराष्ट्राचा शिक्षक ठरला जगात भारी, सोलापूरच्या शिक्षकास सात कोटींचा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ जाहीर

Latest News

राजकीय विश्लेषक राजा माने यांना ‘शांतीदूत’ राज्यस्तरीय पुरस्कार
सोलापूर August 23, 2025
सोलापूर सीईओ जंगम यांनी शिक्षणाधिकार्यांवर चिडून सभागृह सोडले
सोलापूर August 23, 2025
ईडीनंतर आता सीबीआयची कारवाई; अनिल अंबानींच्या घरावर छापे
महाराष्ट्र August 23, 2025
भाजपात बृहद कुटुंबाचा विचार करणारे लोक – फडणवीस
महाराष्ट्र August 23, 2025
 “एआयचा वापर करून दर्जेदार शिक्षण द्यावे” – मंत्री भुजबळ यांचा आग्रह
महाराष्ट्र August 23, 2025
“राष्ट्रीय हितांवर कोणतीही तडजोड नाही” – जयशंकर यांचा अमेरिकेशी चर्चेसंदर्भात स्पष्टीकरण
देश - विदेश August 23, 2025
crime
जळगावमध्ये स्कूल बसचालकाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; १०वीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार
महाराष्ट्र August 23, 2025
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर रिपब्लिकन पक्षाचा विरोध
महाराष्ट्र August 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?