नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या डिजिटल सेवा थांबवण्याचे आदेश केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहेत. बँकेच्या Digital 2.0 या उपक्रमाअंतर्गत असणाऱ्या सुविधा आणि ग्राहकांसाठी नवीन कार्ड्स लाँच करण्याच्या सेवा थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
यामध्ये नवीन क्रेडिट कार्ड लाँच करण्यावरही बंदी आणली आहे. गेल्या 2 वर्षांपासून बँकेला इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि पेमेंट युटिलिटी सेवांमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, परिणामी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. आरबीआयने ठरविल्याप्रमाणे, प्रमुख गंभीर निरीक्षणाचे समाधानकारक अनुपालन केल्यास वरील उपायांवर विचार केला जाईल,’ असंही त्यात नमूद केले आहे.
आरबीआयची ही बंदी स्थायी स्वरूपाची नसून अस्थायी आहे. गेल्या 2 वर्षातील ही तिसरी वेळ आहे, जेव्हा एचडीएफसी बँकेवर कोणत्या प्रकारचे निर्बंध आणण्यात आले आहेत. आरबीआयने यावेळी डिजिटल सेवा अस्थायी स्वरुपात थांबवण्याचे आदेश दिले आहेत, यामध्ये नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावरही निर्बंध आहेत. त्याचबरोबर आरबीआयने असेही म्हटले आहे की या खाजगी बँकेच्या बोर्डाने त्रुटी दूर करत जबाबदारी निश्चित केली पाहिजे.
2 डिसेंबर 2020 च्या आदेशामध्ये आरबीआयने हल्लीच बँकेला सामोरे जावे लागलेली एक समस्या नमूद केली आहे. 21 नोव्हेंबर 2020 रोजी बँकेला त्यांच्या प्राथमिक डेटा सेंटरमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या आउटेजचा सामना करावा लागला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरबीआयने प्राथमिक स्तरावर Digital 2.0 अंतर्गत असणारे सर्व डिजिटल बिझनेसचे लाँच यावर अस्थायी स्वरूपात स्थगिती आणली आहे, इतर आयटी अॅप्लिकेशन जनरेटिंगही करता येणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, HDFC बँकेला ग्राहकांसाटी नवीन क्रेडिट कार्ड्सचे सोर्सिंग करता येणार नाही आहे.
* एचडीएफसीचे स्पष्टीकरण
HDFC बँकेनीही याबाबात स्पष्ट केले आहे की, आरबीआयच्या आवश्यकतेनुसार बँकेने अनुपालन केल्यानंतर हे निर्बंध हटवले जातील. बँकेने असं म्हटलं आहे की, गेल्या दोन वर्षांत आयटी प्रणाली मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बॅलन्स संदर्भातील काम लवकरच बंद करण्याबाबत बँक वेगाने काम सुरू ठेवेल आणि या संदर्भात नियामकांबरोबरच काम करत राहील.