मोडनिंब : सोलापूर पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्या नजीक आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत महामार्ग पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला. ही घटना आज रविवारी सायंकाळी 05:40 दरम्यान घडली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मोडनिंब महामार्ग पोलीस गस्त पथक हे सकाळ-संध्याकाळ वरवडे टोल नाकानजीक वाहन तपासणीसाठी थांबलेले असते. नेहमी प्रमाणे हे गस्त पथक आजही कार्यरत होते.
हैदराबादहूनन मुंबईला निघालेला आयशर टेम्पो (क्र. एम एच ४ एचडी झिरो १७०) ने समोर आलेल्या महामार्ग पोलीस पथकातील पोलीस नाईक सागर औदुंबर चौबे (वय ३४ रा. अलीपूर रोड, बार्शी जिल्हा सोलापूर) यांना धडक दिली.
या घटनेत पोलिस सागर चौबे जागीच ठार झाले.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा,मुलगी असून पाकणी सोलापूर महामार्ग पोलिस पथकातील विशाल चोभे यांचे ते बंधू होत.