सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी सोलापूरचे प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांची निवड आज (मंगळवारी) मुंबईत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली.
प्रा. काकासाहेब कुलकर्णी हे सोलापूर जिल्हा काँग्रेसचे सेक्रेटरी पदी काम करत होते. उच्चशिक्षीत व आभ्यासु ब्राह्मण समाजाचे नेते म्हणून प्रा.काकासाहेब कुलकर्णी यांची राज्यभर ओळख आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ब्राह्मण समाजाचा सगळ्यात मोठा मोर्चा मुंबईत कुलकर्णी यांनी आयोजित केला होता. याच कार्याची दखल घेत माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ही निवड जाहीर केली.
या निवडीमुळे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, प्रदेश अनु. जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिवशरण, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व नगरसेवक विनोद भोसले व सुमित भोसले यांनी अभिनंदन केले.
“काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणीती शिंदे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे”
प्रा.काकासाहेब कुलकर्णी –प्रवक्ते, युवक काँग्रेस