Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्रात भाजपची धडधड वाढली; रासप साथ सोडणार, घेतली पवारांची भेट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

महाराष्ट्रात भाजपची धडधड वाढली; रासप साथ सोडणार, घेतली पवारांची भेट

Surajya Digital
Last updated: 2020/12/08 at 11:13 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने भाजपला जोरदार हादरा दिला. या धक्क्यातून भाजप सावरत नाही तेच आता एका मित्र पक्षाने झटका दिला आहे. भाजपच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त भेट घेतली आहे. यामुळे भाजपची धडधड वाढली आहे.

महादेव जानकर यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या 3 डिसेंबर रोजी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याजवळील व्हिएसआय इनस्टिट्युटमध्ये महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतील. दोन्ही नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली. मात्र, ही भेट कशासाठी होती आणि चर्चेचा तपशील काय होता, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपचे अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे असा दावा केला होता. नुकतेच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला खिंडार पडले आहे. पदवीधर निवडणुकीमध्येही भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली होती.

बीडमध्ये भाजपचे माजी खासदार आणि राज्यमंत्री जयसिंग गायकवाड यांनी जाहीरपणे भाजपवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राज्यात आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. धनगर समाजाचे प्रमुख नेते असलेले महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार

TAGGED: #महाराष्ट्रात #भाजपची #धडधड #वाढली #रासप #साथ #सोडणार #पवारांचीभेट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरद पवारांच्या नावे राज्य सरकार योजना लागू करणार, उद्याच्या बैठकीत मंजुरी
Next Article खुशखबर ! राज्यात 6 हजार शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे पदभरती

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?