Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: देवेंद्र फडणवीसांसोबत भांडण; तरीही मी भाजपासोबत, व्यक्त केली खदखद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

देवेंद्र फडणवीसांसोबत भांडण; तरीही मी भाजपासोबत, व्यक्त केली खदखद

Surajya Digital
Last updated: 2020/12/09 at 4:04 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बारामती : माझे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपासोबतच राहणार असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. आज बुधवारी बारामतीत एका खासगी कार्यक्रमात महादेव जानकर आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. रासप हा भाजपाचा मित्र पक्ष आहे. तरीही महादेव जानकर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.

भाजपावर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार आहे, असे महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच, एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं, असे सांगत माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे भांडण सुरु आहे. पण, त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण एनडीएमध्येच राहणार असल्याचे महादेव जानकर म्हणाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर नाराज आहेत, अशा चर्चांना उधाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी शरद पवारांची घेतलेली भेट घेतल्याचे म्हटले जात होते. मात्र, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात ही भेट होती, असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.

* शरद पवार भेटीचे कारण

आमचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या परवान्यासंदर्भात मी शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर कारखान्याच्या परवान्याचे कामही झाले आहे. तसेच मी शरद पवार आणि अजित पवार यांना भेटणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनाही कळवले आहे, असे जानकर यांनी म्हटले होते. तसेच, काही लोक या भेटीचा वेगळा अर्थ काढत आहेत. मात्र असे करणे म्हणजे पराचा कावळा करण्यासारखे आहे. आमची भेट काही वेळापुरतीच होती त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही एनडीएत आहोत असेही महादेव जानकर यांनी स्पष्ट केले होते.

* आमदार पडळकरांना टोला

याचबरोबर, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न सुरुच असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. याशिवाय, माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही, अशा शब्दात महादेव जानकर यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही टोला लगावला.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #देवेंद्रफडणवीसांसोबत #भांडण #तरीहीमी #भाजपासोबत #व्यक्तकेली #खदखद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोदी सरकारने शेतक-यांना पाठवला नवा प्रस्ताव, शेतकरी संघटनांनी बैठक बोलावली
Next Article सरन्यायाधीशांच्या आईला अडीच कोटींचा गंडा, आरोपीस अटक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?