Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 40 लाखांची सुपारी घेवुन खून करण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

40 लाखांची सुपारी घेवुन खून करण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना अटक

Surajya Digital
Last updated: 2020/12/10 at 6:15 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पंढरपूर : पूर्वी झालेल्या भांडणाचा व जमीन व्यवहाराचा राग मनात धरून चक्क 40 लाखाची सुपारी देऊन खुनाचा प्लॅन आखला गेला. मात्र याचा सुगावा पोलिसांना लागला. मग पोलिसांनी त्यांचा कट रचून प्लॅनच उधळून लावला. खूनाचा हेतूने तयारीत असलेले 4 जणांना गावठी बंदूक, कोयता, कुऱ्हाड, लोखंडी नळीसह एका कारमधून ताब्यात घेतले आहे.

याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले की, बोहाली (ता. पंढरपूर) येथील नागनाथ शिवाजी घोडके याने, माझ्या जीवितास धोका आहे. मला वाचवा म्हणून तक्रार केली होती. या तक्रारी ची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी कदम यांनी पोलिसांना शहानिशा करण्यासाठी सूचना दिल्या.

तेव्हा चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल येथे पोलीस तपासणी करत असताना एका चारचाकी गाडीत 4 जण येताना दिसले. त्यांना थांबवून अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे गावठी बंदूक, कोयता, कुऱ्हाड, लोखंडी नळी मिळून आले. तेव्हा उपविभागीय पोलिस कार्यालय येथे आणून पोलिसी खाक्या दाखवून अधिक चौकशी केली असता त्यांनी प्लॅन कथन केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नागेश घोडके बोहाली याचे आप्पा शिवाजी गोडसे (रा. कौठली ता. पंढरपूर) व संतोष कोरके यांच्याबरोबर जमिनीच्या बाबतीत वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून संतोष कोरके याच्या सांगण्यावरून नागेश घोडके यास मारण्यासाठीचे कटकारस्थान रचल्याचे कबूल केले. पोलिसांनी बंडू सिद्धेश्वर घोडके बोहाली, हणमंत भारत जाधव बोहाली, बंडू दामू मासाळ धायटी (ता. सांगोला), आप्पा शिवाजी गोडसे (कौठली), संतोष कोरके यांना ताब्यात घेउन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो स इ राजेंद्र गाडेकर व पथकाने केली.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #40लाखांची #सुपारी #खून #करण्याच्या #तयारीतअसणाऱ्या #चौघांना #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यमंत्र्यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या घरात घुसून मारण्याची केली भाषा, राजू शेट्टींनीही केली टीका
Next Article कर्मचा-यांसाठी गुडन्यूज! रिटायरमेंट फंडमध्ये सरकारचे योगदान

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?