Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दहशतीखाली वावरणा-यांची घेतली पालकमंत्र्यांनी भेट, दोन दिवसात बिबट्याचा बंदोबस्त करु
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

दहशतीखाली वावरणा-यांची घेतली पालकमंत्र्यांनी भेट, दोन दिवसात बिबट्याचा बंदोबस्त करु

Surajya Digital
Last updated: 2020/12/11 at 2:22 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : करमाळा तालुक्‍यात बिबट्याने तीन बळी घेतले, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या बिबट्याची धास्ती संपूर्ण तालुक्‍याने घेतली आहे. मात्र कुणीही घाबरू नये, वेळप्रसंगी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी हेलिकॉप्टरचा उपयोग केला जाईल. येत्या दोन दिवसांत या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली.

अंजनडोह (ता. करमाळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या जयश्री शिंदे यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांनी आज (शुक्रवारी) सांत्वन करण्यासाठी भेट घेतली. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंजनडोह येथे आयोजित अधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते.

या वेळी मृत जयश्री शिंदे यांचे पती दयानंद शिंदे व त्यांच्या तीन मुलांशी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे यांनी संवाद साधला. आमदार संजय शिंदे, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी ज्योती कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, तहसीलदार समीर माने, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, वनविभागाचे धनंजय पाटील उपस्थित होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पालकमंत्री भरणे पुढे म्हणाले, करमाळा तालुक्‍यात एकापेक्षा जास्त बिबटे असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही; मात्र कुणीही घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रत्येकच बिबट्या मनुष्यावर हल्ला करतो असे नाही. माणसावर हल्ला करणारा एकच बिबट्या आहे, या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग, पोलिस विभाग, महसूल आदी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. शासन स्तरावरही सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सध्या बिबट्या वांगी भागात आहे. या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी, शार्प शूटर, ड्रोन पथक तैनात आहेत. दोन दिवसांत या बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल, असे अश्वस्त केले.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #दहशतीखाली #वावरणा-यांची #पालकमंत्र्यांनी #भेट #दोनदिवसात #बिबट्याचा #बंदोबस्त #करु
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पिस्टल, जिवंत काडतूस, तलवारसह एकजण ताब्यात, महिला फरार
Next Article थुकरटवाडीत राजकीय टोलेबाजी, पंकजा मुंडे – रोहित पवार, सुजय विखे समोरासमोर

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?