Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कंगणाला करनने दिला बॉलीवूडला ‘रामराम’ ठोकण्याचा सल्ला; कंगनाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

कंगणाला करनने दिला बॉलीवूडला ‘रामराम’ ठोकण्याचा सल्ला; कंगनाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं

Surajya Digital
Last updated: 2020/07/21 at 4:39 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : बॉलीवूडमधील करन जोहर याने एका मुलाखती दरम्यान अभिनेञी कंगणाच्या आरोपावर मौन सोडले. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन होत असलेल्या आरोपावरुन करण जोहर शांत होता. जर अभिनेत्री कंगणा राणावतला बॉलीवूडमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर तिने खुशाल बॉलीवूडला रामराम करावा, असे म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडविरोधात आक्रमक झालेली कंगणा सध्या सोशल मीडियात कायम चर्चेत आहे. याच दरम्यान ती वारंवार बॉलीवूडवर आगपाखड करत असते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असे अनेक धक्कादायक खुलासे केले की ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तिने फक्त घराणेशाहीविरोधातच आवाज उठवला नाही तर बॉलिवूडमधील माफियांवरही निर्भिडपणे बोलली.

आदित्य चोप्रापासून करण जोहरपर्यंत कंगनाने सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अनेक मोठे खुलासे केले. एकीकडे अभिनेत्रीच्या प्रतिक्रियांवर बोललं जात आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर करन जोहरचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

करण या व्हिडिओमध्ये कंगनाच्या नावानेच त्याला किती त्रास होतो हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. यात तो म्हणतो की, ‘कंगना प्रत्येकवेळी वुमन कार्ड आणि विक्टिम कार्ड वापरू शकत नाही. आता खूप झालं. जर तुला सिनेसृष्टीत घाबरवलं जातंय तर तू सोडून दे सिनेसृष्टी. तुला कोणीही अडवलेलं नाही.’ या मुलाखतीत तो पुढे म्हणतो की, लोकांनी कंगनाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं तर असेच होणार असल्याचे म्हणाला.

सध्या सोशल मीडियावर अनेक लोकांचं कंगनाला समर्थन मिळत आहे. फक्त  आदित्य चोप्रा आणि करण जोहरच नाही तर कंगनाने महेश भट्टांविरुद्धही अनेक प्रश्न उपस्थित केले.

कंगनाने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की, करण सुशांतला एक फ्लॉप अभिनेता समजायचा. उलट सुशांतच्या ज्या सिनेमाची करणने निर्मिती केली होती तो सिनेमा एग्झिब्यूटर्सला पसंत पडला नाही. अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावा लागला.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अनेक अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांची झाडाझडती सुरू केली. बॉलिवूडचे प्रख्यात निर्माते आणि यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा यांची पोलिसांनी चार तास कसून चौकशी केली. यावेळी त्यांच्यावर पोलिसांकडून असंख्य प्रश्नांचा भडिमार करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्यावर उपचार करणाऱ्या दोन मनोविकार तज्ज्ञांचीही चौकशी केली होती.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

TAGGED: #करनजोहर #कंगनाराणावत #रामराम #बॉलिवूड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिराळा तालुक्यात मोरणा मध्यम प्रकल्प भरला; सांडव्यातून पाणी वाहू लागले
Next Article तुळजापुरात बैलगाडी मोर्चा काढून एक दिवसाचे लाक्षणिक दूध आंदोलन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?