सोलापूर : सोलापुरात ६ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. जप्त केलेल्या सोन्याची अंदाजे किंमत ३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे तब्बल सहा किलो सोने असल्याचेही सांगितले जात आहे. या कारवाईमुळे सोने तस्करांमध्ये खळबळ माजली आहे.
तीन कोटी रुपयांचे सहा किलो सोने ग्रामीण पोलिसांनी जप्त केले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सोने विशाखापट्टणमहून मुंबईत रस्तेमार्गे आणले जात होते. मुंबईत आणण्यात येणारे हे सोने कारमधील चालकाच्या सीटखाली लपवून आणले जात होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रत्येकी एक किलोची ६ सोन्याची बिस्किटे चालकाच्या सीटखाली लपवून ठेवले होते. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने ही कारवाई करत सोने जप्त केले आहे. पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून सावळेश्वर टोलनाक्याजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी चालकासह दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. हे सोने कुणी दिले होते आणि मुंबईत ते कुणाला देण्यात येणार होते, याची माहिती घेतली जात होती. यामध्ये आणखी कोणत्या टोळ्या आहेत? याचाही पोलीस आता शोध घेत आहे. तर या सगळ्यासाठी पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यातूनही गाडीचा शोध घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.