सोलापूर : सोलापूर शहरातील जुळे सोलापूर परिसरातील चंदननगर येथील नीता रेसिडेन्सी या अपार्टमेंटमध्ये शिक्षक महिलेच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. हा सर्व प्रकाश कर्जबाजारपणामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अर्चना विकास हरवाळकर (वय ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अर्चना हरवाळकर ही पती विकास हरवाळकर व मुलगा वेदांत हरवाळकर (वय ०६) असे नीता रेसिडेन्सी मध्ये पहिल्या मजल्यावर राहत होते. आज भर दुपारी दोन वाजता महिला शिक्षिकेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. ही घटना जुळे सोलापूर येथील नीता रेसिडेन्सी येथे घडली. मृत महिलेचे नाव अर्चना हरवळकर असे आहे. या महिलेच्या डोक्यावर गंभीर मार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या महिलेचा अपघाताने मृत्यू झाला; की तिचा खून केला गेला, याचा शोध घेणे सुरु आहे.
दरम्यान, महिलेच्या पतीनेही विष प्राशन केल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरात तर्कवितर्कांना आव्हान आले आहे. या महिलेचा सोमवारी दुपारी दोन वाजता अचानकपणे मृतदेह आढळला. या महिलेच्या डोक्यावर गंभीर दुखापत झालेली आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे महिलेच्या डोक्यात वरवंटा घालून तिचा खून केल्याचा अंदाज आहे. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
महिला मृत अवस्थेत आढळताच परिसरात खळबळ उडाली. अर्चना यांच्या शेजाऱ्यांना त्यांचा खून झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांना कळवले. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान, महिलेचा मृत्यू झाला त्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर, डोक्यात वरवंटा घालून महिलेचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच, पतीने विष प्राशन केल्यामुळे पतीने हा खून केला असावा असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. विकास हरवळकर असे विष प्राशन केलेल्या पतीचे नाव आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* पोलिसांना आला संशय
भर दुपारी मृत्यू आणि मृत्यूच्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर महिलेचा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, असा कोणताही पुरावा न आढळ्याने महिलेच्या मृत्यूचे ठोस कारण समजू शकलेले नाही. तसेच, अर्चना हरवळकर यांचे पती विकास हरवळकर यांनी विष प्राशन केल्यामुळे हे प्रकरण आणखी किचकट झालेले आहे. त्यांनी विष का घेतले असावे, याचे कोणतेही कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, पती विकास यांनीच अर्चना यांचा खून केले असावा, असा संशय पोलिसांना आहे. संशयित विकास हरवळकर यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. तसेच त्यांच्यावर पोलिसांची नजर आहे.