Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बाबो! कसलं धाडस ‘खाकी’ वर्दी वर थुंकुन हात उचलला !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

बाबो! कसलं धाडस ‘खाकी’ वर्दी वर थुंकुन हात उचलला !

admin
Last updated: 2025/03/20 at 5:58 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

खास प्रतिनिधी
सोलापूर: आरोपीना कायद्याची किंवा पोलिसांची जरब राहिली नसल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. कायद्याचं रक्षण करणाऱ्या ‘खाकी’ वर्दीच्या अंगावर ‘हात’ उचलला जात आहे. नागपूरमध्ये उसळलेल्या दंगली दरम्यान एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हातावर कुराडीने वार करण्याचे धाडस आरोपीने केलं, हे प्रकरण अत्यंत ताजे असतानाच, सोलापुरात चक्क ‘खाकी’ वर्दीच्या अंगावर थुंकून, शर्टाला झुंबाझुंबी करून चक्क पोलीस निरीक्षकाला हाणमार करण्याचा प्रकार पोलीस ठाण्यात केलाय. आरोपीचं हे भयानक धाडस म्हणावं लागेल. पोलीस निरीक्षकाबरोबर एका पोलीस कर्मचाऱ्याला ही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय

सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला छातीवर बुक्की मारत पोलीस शिपायाच्या शर्टाला धरून ओढा ओढी करून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका युवका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नाईंट्या उर्फ ओंकार संतोष नलावडे राहणार सुंदरबाई डागा प्रशाला दमानी नगर सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलीस कॉन्स्टेबल दिनेश नारायण घंटे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीत व इतर दोन ते तिन इसम यांचेत तक्रार चालु होती. वरील आरोपीत हा स्वतःहुन रस्त्याचे कडेला असलेल्या फुटपाथवर स्वतःचे डोके व तोंड आपटुन घेत असल्याने त्याचे डोक्यातुन रक्त येत होते. वरील आरोपीत यास रिक्षातून पोलीस ठाणे येथे आणत असताना रिक्षा मध्ये फिर्यादीच्या अंगावर थुंकून शिवीगाळ करुन फिर्यादीच्या शर्टाला धरुन ओढा ओढी केली.

पोलीस ठाणे येथे उपचाराची वैदयकीय यादी तयार करीत असताना वरील आरोपीताने शिवीगाळ करुन परत अंगावर थुंकला. आरोपीत हा आरडाओरड करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यास शांत बसण्यास सांगत असताना त्याने माने यांच्या छातीवर डावे बाजूस हाताने बुक्की मारली सर त्यास अडवत असताना त्याने हाताने त्यांचे उजव्या हाताचे मनगटाजवळ मारल्याने त्यांना जबर मुका मार लागला आहे. सदर इसमाने पोलीसांचे शासकिय कामात अडथळा आणुन फिर्यादीस धक्का बुक्की करुन वपोनि माने यांचे छातीवर मारुन जबर दुखापत केली आहे.

You Might Also Like

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरण
Next Article मुंबईत “या” समाजाची बैठक, बैठकीत निर्णय “असा” झाला

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?