Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवकालीन दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनातून छत्रपतींच्या पराक्रमाचे सजीव दर्शन !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शिवकालीन दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनातून छत्रपतींच्या पराक्रमाचे सजीव दर्शन !

admin
Last updated: 2025/05/23 at 3:20 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

फोंडा, 23 मे (हिं.स.) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी, फोंडा येथे पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त शिवकालीन ऐतिहासिक आणि दुर्मिळ शस्त्रांचे भव्य प्रदर्शन धर्मप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरले. ६ हजार चौरसफुट क्षेत्रात मांडण्यात आलेल्या या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे सजीव चित्र उभे केले. ३० हजारांहून अधिक धर्मप्रेमी नागरिक, तसेच संत, महंत आणि आध्यात्मिक मार्गदर्शकांच्या उपस्थितीत झालेल्या या महोत्सवात शिवकालीन शौर्य, पराक्रम आणि बलिदान यांची आठवण प्रत्येकाच्या मनात ठसठशीतपणे कोरली गेली.

प्रदर्शनात कोल्हापूरच्या सव्यासाची गुरुकुलम आणि पुण्याच्या शिवाई संस्थान यांचे शस्त्रप्रदर्शन, गोव्यातील सौंदेकर घराण्याची प्राचीन शस्त्रे, तसेच सरदार येसाजी कंक यांची तलवार आणि सरदार कान्होजी जेधे यांचे चिलखत प्रमुख आकर्षण ठरले. त्यात सर्वात हृदयस्पर्शी ठरले ते छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने बंदिस्त करताना वापरलेले मूळ साखळदंड, जे शिवले कुटुंबाने पिढ्यान्‌पिढ्या जतन केले आहेत. या साखळदंडांचे प्रथमच सार्वजनिक दर्शन याच महोत्सवात झाले.

या प्रसंगी शिवले कुटुंबातील वंशज सर्वश्री सागर शिवले, कुमार शिवले, सोमनाथ शिवले, दीपक टाकळकर आणि वेदांत शिवले यांचा हिंदु जनजागृती समितीचे पूर्वाेत्तर भारताचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी श्री. कुमार शिवले म्हणाले, “राजांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन समाजात धर्मप्रेम जागवण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले गेले आहे.”

प्रदर्शनात शिवकालीन युद्धकलेत वापरण्यात येणारी दुर्मिळ शस्त्रे : विविध प्रकारच्या तलवारी, बंदुका, ढाली, जांबिया, तोफा, कट्यारी, चिलखत, शिरस्त्राण, भाले, कुर्‍हाडी, त्रिशूल, अंकुश, सिकल, पुरबा इत्यादींचे प्रदर्शन करण्यात आले. याशिवाय छत्रपतींच्या सैन्यातील सरदारांची सचित्र पराक्रमाची माहितीही उपस्थितांना इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारी ठरली.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article युद्धात भारताच्या विजयप्राप्तीसह सैनिक आणि धर्मकार्य करणाऱ्यांच्या रक्षणार्थ शतचंडी याग संपन्न
Next Article भोपाळ-इंदोर महामार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?