बार्शी / सोलापूर : बार्शी तालुक्यातील आळजापूर येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार (ता.31) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी पोलिस आरोपीला जोपर्यंत ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेत संताप व्यक्त केला. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
दरम्यान, झालेल्या मारहाणीमध्ये दोघा सख्या भावांपैकी अमोल अंगद (वय 27 रा. अळजापूर ) या एका भावाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा भाऊ संजय अंगद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर धाराशिवच्या सरकारी रुग्णालया उपचार सुरु असल्याची माहिती वैराग पोलीस ठाण्याच्यावतीने देण्यात आली.
संशियत आरोपी मयुर अनिल दराडे याने गैरसमज करून घेवून लाथाबुक्यांनी मारहाण करीत असताना संजय अंगद यांचा भाऊ अमोल अंगद हा सोडवण्यासाठी आला असता,
त्यास मयुर दराडे याने जिवे मारण्याच्या उद्देशाने जोरात ढकलुन दिले या दरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत करून जिवे ठार मारले असल्याने मृतचा भाऊ संजय अंगद यांच्या फियादीवरून संशयित आरोपी मयुर अनिल दराडे याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 103(1),115(2), 351 (2) वैराग पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल. पुढील तपास वैराग पोलीस करीत आहेत.
उपचारापूर्वीच अमोल अंगद यांचा मृत्यू
फिर्यादीचे नातेवाईक घटनास्थळी आले. त्यांनी फिर्यादीच्या बेशुद्ध भावास अमोल यास पाहून आत्याचा नवरा दत्तात्रय देशमुख यांनी चार चाकी गाडीतून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल केले असता येथील डॉक्टरांनी तपासणी केली. उपचारापूर्वी अमोल अंगद मृत झाल्याचे सांगितले.
निव्वळ गैरसमज झाला अन्…
यातील फिर्यादी हे गावातील व्यक्ती नाना गाडेकर यास ‘चल येथुन निघ’ असे म्हणाले, असता ते संशयित आरोपी मयुर दराडे यास म्हणाले. असल्याचा गैरसमज करून घेवून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असताना फिर्यादीचा भाऊ अमोल अंगद हा सोडवण्यासाठी आला असता त्यास संशयित आरोपी दराडे याने तुला बघून घेतो, असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने जोरात पाराच्या कठड्यावर ढकलून त्याच्या डोकीस गंभीर दुखापत करून जिवेठार मारले. त्याामुळे ङ्गिर्यादीची दराडे यांचे विरूध्द तक्रार आहे. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.