Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सहकार क्षेत्रातील गणेश माने देशमुखांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सहकार क्षेत्रातील गणेश माने देशमुखांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Surajya Digital
Last updated: 2021/03/18 at 11:09 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी बुधवारी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार हुसेन दलवाई, आमदार प्रणिती शिंदे, धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते.

गणेश माने देशमुख यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष उभारणीसाठी मोठा फायदा होणार आहे. सहकार क्षेत्रात जयहिंद परिवाराच्या यशस्वी वाटचालीत गणेश माने देशमुख यांचे योगदान मोलाचे आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यांच्यामुळे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होईल, असा अंदाज राजकीय वर्तृळातून व्यक्त होत आहे. आचेगाव सारख्या अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या तालुक्यातील सीमेवर कारखाना सुरू करून शेतकरी बांधवाना दिलासा दिला देण्याचा प्रयत्न केला आहे.

* भाजपकडून विधानसभेसाठी होते इच्छुक

मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा शेतकरी मेळावा घेऊन भाजप कडून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला होता. दुष्काळी भागातील जनतेला आणि शेतकरी यांच्यासाठी पाण्याची कमतरता भासू नये तसेच सेंद्रिय शेतीवर काम करणारे एक अभ्यासु उमदे नेतृव अशी त्यांची ख्याती आहे. आता ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपली राजकीय कारकीर्द अधिकृतपणे अजमावत आहेत. त्यांच्या समर्थकानी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

गणेश माने बापू हे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे (सीओईपी)चे विद्यार्थी आहेत. ते एक दूरदृष्टी असलेले हे युवक नेते आहेत. त्यांची एक वैचारिक बैठक आहे. सर्वांना सतत मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. सतत विधायक कामात राहणे हा त्यांचा पिंड आहे. आता येत्या काळात काँग्रेस पक्षाचे काम तळागाळातील जनतेपर्यत पोचवून जनतेच्या उत्कर्षात माझा सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Aachegaon #ganeshmanedeshmukh #Join #congress, #सहकारक्षेत्रातील #गणेशमानेदेशमुखांचा #काँग्रेसमध्ये #प्रवेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article परमबीर सिंह यांची उचलबांगडी, आता हेमंत नगराळे मुंबईचे पोलिस आयुक्त
Next Article पराभव झाल्याने बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?