मुंबई : आधार कार्ड धारकांसाठी सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. आता आधार अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. UIDAI ने आधार अपडेट करण्याचे शुल्क रद्द केले आहे. जर तुम्ही आधार अपडेटची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली, तरच तुम्हाला आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. आधार धारकांना तीन महिन्यांसाठी या मोफत आधार अपडेट सुविधेचा लाभ घेता येईल. Free, free, free… now Aadhaar card update free, but with a three month deadline
सध्या सर्वच बाबींची पूर्तता करण्यासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. दरम्यान, या आधार कार्डबाबत केंद्र सरकारने नवा नियम जारी केला आहे. आधार कार्डचे वाढते महत्त्व घेऊन केंद्र सरकारने लक्षात घेऊन केंद्र नवी मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) एक ट्रिट करून याबाबतची माहिती दिली आहे..
तुम्ही जर आधार कार्ड काढून दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असेल तर संबंधित आधार कार्ड अद्ययावत म्हणजेच अपडेट करण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. या प्रक्रियेत नागरिकांना आधार कार्डवरील पत्ता, नाव, जन्म तारीख, मोबाइल क्रमांक, फोटो अपडेट करावे लागणार आहे. या अपडेट प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, तुम्ही जर महा-ई-सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया केल्यास तुम्हाला फक्त ५० रुपये शुल्क भरावे लागेल. केंद्र सरकारची ही सुविधा १५ मार्चपासून सुरू झाली असून येत्या १४ जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
https://twitter.com/UIDAI/status/1636330492755623939?t=oRxCzPFvWwIOJogZDdSetw&s=19
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://twitter.com/UIDAI/status/1636012743906959364?t=g-GvC-SXXOgJ5r6Iyf2ikA&s=19
या प्रक्रियेसाठी तुम्हाला माय आधार पोर्टलच्या माय आधार डॉट यूआयडीएआय डॉट जीवोव्ही डॉट इनवर जावे लागेल. त्यानंतर आधार लॉग इन बटनावर क्लिक करा. यानंतर तुमचा आधार नंबर टाका व दिलेला कॅपचा टाका, यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करून ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये टाका, त्यानंतर लॉग इन करा. या प्रक्रियेनंतर नेक्स्ट पेजवर गेल्यास डॉक्युमेंटस् अपडेट या अॅप्शनवर क्लिक करा, त्यानंतर पुढच्या पेजवर नेक्स्टवर क्लिक करा, येथे तुम्हाला आधार डॉक्युमेंट अपडेट कसे करायचे, याची माहिती दिसेल. त्यानंतर खाली असलेल्या नेक्स्ट बटनावर क्लिक करा, आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर असलेली तुमची वैयक्तिक माहिती स्क्रीनवर दिसेल.
ही माहिती एकदा चेक करून घ्या आणि कुठल्या डॉक्युमेंटवर अपडेट करायचे अप्रेल तर त्यातील माहिती बरोबर असेल तर त्यातील माहिती बरोबर लिहून आय व्हेरीफाय दॅट अबाऊ डिटेल्स आर करेक्ट या ऑप्शनवर क्लिक करा, यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट होईल.