Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्ह्यात मतदान ओळखपत्रास आधार जोडणी मोहीम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर जिल्ह्यात मतदान ओळखपत्रास आधार जोडणी मोहीम

Surajya Digital
Last updated: 2022/07/26 at 4:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांची माहिती□ १ ऑगस्टपासून सोलापूर शहर जिल्ह्यात मोहिमेस प्रारंभ□ २,६०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती, बीएलओकडून घरोघरी जाऊन करणार आधार जोडणीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ असे जोडा आधार कार्ड□ तालुकानहाय मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे :भारत वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

□ उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांची माहिती

□ १ ऑगस्टपासून सोलापूर शहर जिल्ह्यात मोहिमेस प्रारंभ

□ २,६०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती, बीएलओकडून घरोघरी जाऊन करणार आधार जोडणी

 

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये १ ऑगस्ट ते २३ मार्च च्या दरम्यान मतदान ओळखपत्रास आधार जोडणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. आधार कार्ड जोडणी ऐच्छिक असल्याने जास्तीत जास्त मतदारांनी या मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी केले. Campaign to link Aadhaar to Voter ID Card in Solapur district

 

मतदाराकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे आहे. आधार लिंकिंग हे मतदारांच्या ऐच्छिक असणार आहे. मतदार यादीत डबल आणि बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार कार्ड, आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे.

 

प्रत्येक मतदाराकडून आधार क्रमांक विहित स्वरूपात मिळवण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. ऑनलाइन पध्दतीने आधार जोडणी होणार आहे त्याचबरोबर बीएलओमार्फत ही परोघरी जाऊन आधार जोडणीचे काम करणार आहेत. यासाठी जिल्ह्यात ३५०० बूथवर २६०० लोकांची टीम करण्यात आली असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदारांची संख्या ही ३५ लाख ६२ हजार ५६ असून त्यापैकी २१५ हे तृतीयपंथी मतदार आहेत.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ असे जोडा आधार कार्ड

मतदान ओळखपत्र आदर्श लिंक करण्यासाठी सर्वप्रथम वोटर पोर्टल इएसआय गव्हर्मेंट डॉट इन या लिंकवर जाऊन वोटर पोर्टल ओपन करा आणि आपली सविस्तर माहिती भरावी. बीएलओमार्फत गरुड ॲपद्वारे आधार जोडणी होणार. वोटर आयडी कार्ड नंबर आधार कार्ड नंबर या फॉरमॅटमध्ये १६६ किंवा ५१९६९ या नंबर वर एसएमएस करून आधार लिंक करता येते.

 

□ तालुकानहाय मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे :

उत्तर सोलापूर (३,०५,०९३), दक्षिण सोलापूर (३,३०, ४१९), शहर मध्य (३, ११, ५६२), करमाळा (३,१७००५), माढा (३३० ६३३), बार्शी (३,२०४८०), मोहोळ (३,१२,०२९), अक्कलकोट (३,५०,३९८), पंढरपूर (३,५०,३६८), सांगोला (३,०५,६५८), माळशिरस (३, २८, ४११ )

 

 

“एक ऑगस्ट २०२२ पासून मतदान ओळखपत्रास आधार कार्ड जोडणी ही मोहीम सुरू होणार आहे. या उपक्रमाचा जास्तीत मतदारांनी लाभ घ्यावा. मतदान ओळखपत्रास आधार कार्ड जोडणी ऐच्छिक असल्याने जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी. त्यामुळे दुबार नावे कमी होतील. बोगस मतदानाला ही आळा बसेल. आधार जोडणी करून प्रशासनास सहकार्य करावे”

भारत वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

 

 

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #Campaign #link #Aadhaar #Voter #ID #Card #Solapur #district, #सोलापूर #जिल्हा #मतदान #ओळखपत्र #आधार #जोडणी #मोहीम
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्राकडून आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण खात्याच्या कामांचं ऑडिट
Next Article माळशिरस : नगरपरिषद नगरपंचायतीसाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?