प्रतिनिधी
अक्कलकोट -मावा खाऊन अंगावर थुंकल्याच्या तक्रारीवरून दोन गटात लोखंडी रॉड,काठी आणि हंटरने केलेल्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले . ही घटना अक्कलकोट येथील वेलकम हॉटेल आणि उड्डाणपूल येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली . या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिसानी परस्परविरोधी फिर्याद नोंदवून दोन्ही गटातील ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पहिल्या गटातील सुरज सिद्धाराम गायकवाड (वय १९ रा.कोन्हाळी ता.अक्कलकोट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तौफिक मजीद चौधरी, फरदीन भेलमे, आदित्य बिराजदार (सर्व रा.दर्शनाळ) आणि अन्य तीन अशा एकूण सहा जणाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरज गायकवाड आणि त्याचे दोघे मित्र असे दुचाकीवरून वरून जात असता चौधरी हा थुंकल्याने त्यांच्या अंगावर घाण पडली होती. गायकवाड यांनी त्यांना शिवीगाळ केली तेव्हा चौधरी याने आम्हाला दोघांना बघून मारता का ? असे म्हणत त्याने फोन करून स्कार्पिओ गाडी बोलावून घेतली. त्यातून आलेल्या चौघांनी त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. आणि काठी आणि हंटरने मारहाण करून गंभीर जखमी केले. असे गायकवाड यांच्या फिर्यादीत नमूद आहे.
तर तौफिक चौधरी (वय 37 राहणार दर्शनाळ) याने दिलेल्या विरुद्ध फिर्यादीवरून अनोळखी तिघा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सकाळी ११ वाजेच्या सुमारासआपण अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे हजेरी घेऊन येत होतो. कर्जाळ येथील पेट्रोल पंपासमोर चौधरी याचा मामा फरदीन हा थुंकला होता. ते त्यांच्या अंगावर पडल्याचा राग धरून वरून तिघांनी त्यांना रॉड आणि लाथाबुक्याने मारहाण करून जखमी केले. असे त्याच्या फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक बगाव आणि हवालदार सुरव करीत आहेत .
—