Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सपोनि अश्‍विनी बिद्रे हत्या प्रकरणी बडतर्फ अभय कुरुंदकरला जन्मठेप !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

सपोनि अश्‍विनी बिद्रे हत्या प्रकरणी बडतर्फ अभय कुरुंदकरला जन्मठेप !

admin
Last updated: 2025/04/21 at 3:32 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

* दोन साथीदारांना ७ वर्षांची शिक्षा

* न्यायालयाचे कडक शब्दात ताशेरे

पनवेल, २१ एप्रिल (हिं.स.) : कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (ता. हातकणंगले) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला पनवेल सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील कुरुंदकर यांचे साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बिद्रे हत्याकांड हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले होते. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलं की, ही हत्या क्रूर आणि अमानवी स्वरूपाची होती. एका महिला पोलिस अधिकाऱ्याची फसवणूक करून, नंतर तिचा जीव घेण्याचे कृत्य समाजाला धक्का देणारे आहे. तपासातील पोलिसांच्या भूमिका आणि कार्यपध्दतीवर न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. दरम्यान प्रकरणातील आरोपी राजू पाटील याची मात्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

यापूर्वी पनवेल न्यायालयाने ५ एप्रिलला या सर्वांना दोषी ठरवले होते आणि ११ एप्रिलला या सर्वांना शिक्षा सुनावण्यात येणार होती; मात्र काही कारणामुळे ती पुढे गेली आणि २१ एप्रिलला निकाल देण्यात आला.

साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे-गोरे यांची ११ एप्रिल २०१६ रोजी हत्या करून त्यांचा मृतदेह तुकडे करून तो वसईच्या खाडीत फेकून देण्यात आला होता. या प्रकरणी ७ डिसेंबर २०१७ रोजी ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेले तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना अटक करण्यात आली होती. तब्बल ९ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रकरणातील कुंदन भंडारी आणि महेश पाटील हे गेल्या काही वर्षांपासून अटकेत असून त्यांनी ही शिक्षा अगोदरच भोगली असल्याने त्यांची सुटका होणार आहे.

—————

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वर्तमानपत्र वाटणारा मुलगा झाला धर्मदाय आयुक्तालयात लिपीक
Next Article सोलापुरात दोन महिने पाण्याची चिंता मिटली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?