Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सात वर्षे सक्तमजुरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सात वर्षे सक्तमजुरी

Surajya Digital
Last updated: 2021/07/29 at 9:49 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अक्या उर्फ आकाश सिध्दराम शिंदे (वय- २१) याला न्यायालयाने दोषी ठरवले. फिर्यादीची शेजारीण ही फितुर झालेली असतानाही न्यायालयाने त्यांच्यापुढे आलेल्या पुराव्यावरुन आरोपीला दोषी धरुन शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश  यु. एल. जोशी यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

याबाबत हकीकत अशी की, ०५ मे २०१७ रोजी दुपारच्या सुमारास यातील फिर्यादी ही घरामध्ये जेवण करत होती व त्यावेळी तिची अल्पवयीन नात पिडीता ही बाहेर खेळत होती. त्यावेळी तिच्या शेजारणीच्या मुलीने फिर्यादीला सांगितले की, आरोपी हा पिडीतेबरोबर काहीतरी करीत आहे, त्यावेळी फिर्यादी ही शेजारच्या घराकडे गेली असता त्या घराचे दार आतून बंद तेव्हा फिर्यादीने दाराच्या फटीतून पाहिले असता आरोपी हा स्वतःचे व पिडीतेचे कपडे काढून अत्याचार करताना आढळला.

हे पाहून फिर्यादी जोरात ओरडली असता त्याने दार उघडले. त्यावेळी पिडीता ही घाबरलेली होती. त्यावेळी फिर्यादीने या संदर्भात पिडीतल्या विचारले असता, तिने सांगितले की आरोपी हा तिला पैशे देतो असे म्हणून गोड बोलून घेवून जावून कपडे काढले होते असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने आरोपीला पोलीस स्टेशनला घेवून गेली व त्यानंतर फिर्याद दिली.

फिर्यादीवरुन आरोपी विरुद्ध ३७६ व लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण कागदा २०१२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर यातील तपासिक अंमलदार यांनी तपास करून आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या प्रकरणात सरकारतर्फे एकूण ७ साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी पिडीता व तपासी अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. फिर्यादीची शेजारीण ही फितुर झालेली असतानाही न्यायालयाने त्यांच्यापुढे आलेल्या पुराव्यावरुन आरोपीला दोषी धरुन शिक्षा ठोठावली.

सरकारी वकिल अॅड. शैलजा क्यातम यांनी युक्तीवाद करताना हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, आरोपीला पिडीता ही लहान आहे हे माहित असतानाही त्याने अशा प्रकारचे विघातक कृत्य केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

न्यायालयाने सरकार पक्षाचा पुरावा व युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला भादवि कलम ३७६ सह ५११ आणि लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण कागदा २०१२ चे कलम ४ सह १८ अन्वये दोषी धरुन लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण कागदा २०१२ चे कलम ४ सह १८ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा १०,०००/- दंड व दंड न भरल्यास १ महिना सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली.

यात सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकिल अॅड. शैलजा क्यातम आणि अॅड. माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले, तर आरोपी तर्फे अॅड. संतोष बाराचरे यांनी काम पाहिले. तसेच सदर प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून पो.कॉ. १४८२ एम.जी. कोणे यांनी मदत केली.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Abuse #minorgirl #sevenyears #hardlabor, #अल्पवयीन #मुलीवर #अत्याचार #सातवर्षे #सक्तमजुरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चार तालुक्यांचा समावेश करुन स्वतंत्र पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव एकमताने मंजूर
Next Article विजेचा शॉक लागून बालिकेचा मृत्यू, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?