Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्कलकोट रोडवर अल्टोकार – ट्रकचा भीषण अपघात, तीन ठार तर चार जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अक्कलकोट रोडवर अल्टोकार – ट्रकचा भीषण अपघात, तीन ठार तर चार जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/11/23 at 8:29 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 सोलापूरची कीर्ती भराडिया उद्या मुंबईत करणार विश्वविक्रम ; अरबी समुद्रात ३६ किमी अंतर न थांबता पोहणार

सोलापूर / अक्कलकोट : अक्कलकोटहून आळंदकडे भरधाव वेगाने निघालेल्या अल्टो कारची समोरून येणाऱ्या ट्रकला शिरवळजवळ (ता. अक्कलकोट) जोरात धडक बसली. त्यात एका चिमुकलीसह  महिला – पुरुषांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिन्ही मृतदेह अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे. तर जखमींवर जवळील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. Altocar-truck accident on Akkalkot road, three killed and four injured in Aland Indi Vijaypur

अक्कलकोटहून आळंदकडे भरधाव वेगाने निघालेल्या चारचाकी कारची समोरून येणाऱ्या ट्रकला अक्कलकोट तालुक्यातील शिरवळजवळ जोरात धडक बसली. त्यात एकाच कुटुंबातील एका चिमुकलीसह दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. चारजण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

गुलबर्गा (कर्नाटक) जिल्ह्यातील आळंद येथे मुलाला स्थळ पाहण्यासाठी निघाले असल्याची माहिती आहे. इंडी गावातील प्रतिष्ठित असे कुटुंब म्हणून त्यांची ओळख आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कर्नाटकातील इंडी (जि विजयपूर) गावावर शोककळा पसरली आहे.

मृतदेह अक्कलकोट येथील सरकारी रुग्णालयाकडे रवाना केले तर जखमींना जवळील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज बुधवारी (ता. 23) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. निसार मच्छीवाले अशी त्यांची इंडी गावात ओळख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

चालक हैदरअल्ली खुदबुद्दीन मुल्ला (वय ४० रा. इंडी ता. इंडी जि. विजापूर),  आहेजा इमामसाब कडलासकर (वय दिड वर्ष ), सलमा अब्दुल खालीद लष्करी (वय ४८ रा. इंडी जिल्हा विजापूर ) हे तिघे गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले आहेत.

यातील मयत चालक हैदरअल्ली खुदबुद्दीन मुल्ला याला मुलगी बघण्यासाठी आळंद ला चाललेले होते, खालील नमूद इसम व महिला हे गंभीर जखमी आहेत. खालिद गफूरसाब लष्करी (वय- 55), जुबेर खालीद लष्करी ( 22 वर्षे) , बशिरा अरब सौदागर (वय 35 वर्षे) , उमेमा नगारे (वय 2 वर्षे)  हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील ट्रक चालकावर उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून  चालकास पोलिसानी ताब्यात घेतले आहे.

 

 

गुलबर्गा (कर्नाटक) जिल्ह्यातील आळंद येथे मुलाला स्थळ पाहण्यासाठी जात असाना शिरवळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावावरून फरशी घेऊन सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला आळंदकडे जाणाऱ्या अल्टो कारने (एमएच 12 सीवाय 5552) समोरून धडक दिली. दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला आहे. चारचाकी वाहनाचा वेग खूप होता, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

 

रस्ता मोठा असतानादेखील कारचालकाचा ताबा सुटला आणि सरळ कार ट्रकला धडकली. त्यात कार चालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे.

 

ट्रक चालकावर उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  अपघातस्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी व पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी व अमंलदार यांनी तात्काळ जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी हे करीत आहेत.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

》 सोलापूरची कीर्ती भराडिया उद्या मुंबईत करणार विश्वविक्रम ; अरबी समुद्रात ३६ किमी अंतर न थांबता पोहणार

सोलापूर – येथील हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कीर्ती नंदकिशोर भराडिया ही उद्या गुरुवारी (ता. २४) मुंबईतील अरबी समुद्रात वरळी सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया हे समुद्रातील ३६ किलोमीटरचे अंतर न थांबता पोहून पार करत विश्वविक्रम करणार असल्याची माहिती स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सरचिटणीस झुबिन अमारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील वरळी सी लिंक येथून कीर्ती ही पोहण्यास सुरुवात करणार असून, रात्री साधारण आठ वाजेपर्यंत गेटवे ऑफ इंडिया येथे ती पोहोचणार आहे. यासाठी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मार्कंडेय जलतरण तलाव येथे दररोज सहा ते सात तास ती सराव करीत आहे. विशेष म्हणजे मागील एक महिन्यापासून मुंबई येथील समुद्रातसुद्धा तिने पोहण्याचा सराव केला आहे.

या विक्रमाचे परीक्षण करण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यासाठी तिला सोलापुरातील प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या विक्रमासाठी स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर या संस्था तिला सहकार्य करीत असल्याचेही ते म्हणाले.

 

या पत्रकार परिषदेस सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुदेश देशमुख, मानद सचिव पार्वतय्या श्रीराम, रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष कालिदास जाजू, जलतरणपटू कीर्ती भराडिया, तिचे वडील नंदकिशोर भराडिया, प्रशिक्षक श्रीकांत शेटे तसेच श्यामसुंदर भराडिया, जयेश पटेल, प्रताप सूर्यवंशी यांची उपस्थित होते.

 

You Might Also Like

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

TAGGED: #Altocar #truck #accident #Akkalkot #road #threekilled #four #injured #Aland #Indi #Vijaypur #solapur, #अक्कलकोट #रोडवर #अल्टोकार #ट्रक #भीषण #अपघात #तीनठार #चारजखमी #आळंद #इंडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरची कीर्ती भराडिया उद्या मुंबईत करणार विश्वविक्रम
Next Article ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती चिंताजनक, मृत्यूच्या बातम्या खोट्या

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?