जम्मू, 13 जुलै (हिं.स.) :
जम्मू
आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील खुदवानी भागात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय
महामार्गावर अमरनाथ यात्रेच्या ताफ्याच्या तीन बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातात
१० हून अधिक यात्रेकरू जखमी झाले. बालटालकडे जाणाऱ्या यात्रेच्या ताफ्याच्या तीन
बस एकमेकांवर आदळल्याने हा अपघात ताचलू क्रॉसिंगजवळ झाला.
अपघातात
जखमी झालेल्या सर्व यात्रेकरूंना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. कैमोह
रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली की, सुमारे
नऊ यात्रेकरूंना प्राथमिक उपचार दिल्यानंतर अनंतनागमधील सरकारी वैद्यकीय
महाविद्यालत जाण्यास सांगितले आहे. सर्व जखमी यात्रेकरूंच्या दुखापती किरकोळ असून
त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना चांगल्या
उपचारांसाठी आणि औपचारिकतेसाठी जीएमसी अनंतनाग येथे पाठवण्यात आले आहे.
प्रवाशांसाठी
प्रशासनाने आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत आणि त्यांच्या सोयी आणि सुरक्षिततेची
खात्री करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
