सांगोला प्रतिनिधी
सांगोला-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील राजापूर पाटी ते मेडशिंगी जुन्या रोडवर वायदंडे वस्ती वाडेगाव येथील चेतन रमेश वायदंडे व त्यांचा मुलगा सिद्धार्थ वय अडीच वर्ष हे रस्ता ओलांडून जात असता पिकप ने सिद्धार्थ यास जोराने धडक दिल्याने जखमी होऊन मयत झाल्याची घटना सोमवारी 24 मार्च रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली याबाबत माहिती अशी की सांगोला-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील राजापूर पाटी ते मेडशिंगी रस्त्यावर वायदंडे वस्ती वाडेगाव
येथे सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास चेतन रमेश वायदंडे व त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा सिद्धार्थ हे चुलते संजय वायदंडे यांच्या घरी आले होते ते परत स्वतःच्या घराकडे रस्ता ओलांडून जात असता पिकप (एम एच 13-डी क्यू-39 47)ने भरदाव वेगाने येऊन सिद्धार्थ यास धडक देऊन गंभीर जखमी करून न थांबता मेडशिंगी गावाकडे निघून गेला त्यानंतर तेथील नागरिकांनी सिद्धार्थ त्वरित सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी यांनी उपचारापूर्वी मयत झाला असल्याचे सांगितले सिद्धार्थ याच्या मृत्यूस चालक समाधान चव्हाण राहणार पाटकळ तालुका मंगळवेढा हा कारणीभूत असून त्याच्याविरुद्ध सांगोला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहे