Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लांबोटी अपघातात दोघे ठार; एक गंभीर जखमी, अपघात की घातपात ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

लांबोटी अपघातात दोघे ठार; एक गंभीर जखमी, अपघात की घातपात ?

Surajya Digital
Last updated: 2022/03/11 at 2:36 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मोहोळ : सोलापूरकडून मोहोळकडे येणाऱ्या मोटारसायकलला मोहोळकडून सोलापूरकडे जाणाऱ्या मोटारसायकलने समोरासमोर एकमेकांना धडक दिली. या अपघातामध्ये दोघेजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आहे की घातपात असल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त केला जात आहे.

दीपक बाळासाहेब सरवदे (वय १९) व विक्रम नागनाथ प्रक्षाळे (वय २४ रा. नजिक पिंपरी, ता.मोहोळ) अशी  मृतांची नावे आहेत तर गंभीर जखमी हा माढा येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यास पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले आहे.

प्रथमदर्शनी आम्हाला हा अपघात दिसत आहे. परंतु नातेवाईकांची तक्रार असेल, तर याबाबत सखोल चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर, यांनी दिली.

पोलीस निरीक्षक अशोक सायकर हे राजकीय लोकांचे ऐकून काम करीत आहेत, असा आरोप करत जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत नाही; तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी आग्रही भूमिका मृताचे नातेवाईक पंचायत समितीचे उपसभापती अशोक सरवदे यांनी घेतली आहे.

Two killed in lanboti accident; A serious injury or accident?

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

त्या दोन्ही मोटारसायकल एका टँकरला धडकल्या. अश्या झालेल्या विचित्र अपघातात एका मोटारसायकलवरील दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. यानंतर तो अपघात आहे की घातपात? यावर मृतांच्या नातेवाईकांमध्ये चर्चा सुरू होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही.

नजिक पिंपरी येथील दीपक सरवदे व विक्रम प्रक्षाळे हे दोघेजण गुरूवारी (ता. १०) सायंकाळी ५:३० वाजनेच्या सुमारास आपली मोटारसायकल (क्र. एम एच १३ सीसी ७७४०) वरून सोलापूरकडून मोहोळकडे येत होते. तालुक्यातील लांबोटी येथील सीना नदीच्या पुलावर आल्यावर समोरून माढा येथील (नाव माहिती नाही) एकजण एम एच ४५ ए के ११३२ या दुचाकीवरून सोलापूरकडे वेगात जात होता.

सध्या या हद्दीत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अचानकपणे दोन्ही मोटारसायकल समोरासमोर आल्याने अपघात झाला. या अपघातामुळे दोन्ही मोटारसायकल बाजूने जाणाऱ्या ट्रकच्या धक्क्याने टँकर (क्र. एम एच ४३ ई ४४६९) समोर पडल्या. त्यामुळे झालेल्या अपघातात सरवदे व प्रक्षाळे हे दोघे जागीच ठार झाले तर माढा येथील मोटारसायकल चालक गंभीररीत्या जखमी झाला.

हा अपघात नसून घातपाताचा प्रकार आहे, त्याबाबतची चौकशी करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी येथील मृताच्या नातेवाइकांनी मोहोळ पोलिस ठाण्यात घोषणाबाजी करत मोर्चा आणला होता. रात्री उशिरापर्यंत या प्रकरण बाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #Two #killed #lanboti #accident #serious #injury #accident, #लांबोटी #अपघात #दोघेठार #एकगंभीरजखमी #घातपात #सरवदे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या उमेदवाराने केला मुख्यमंत्री चन्नी यांचा पराभव
Next Article 16 जिल्ह्यात स्त्री रोग रुग्णालय, आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटी

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?