Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Accident Raj Thackeray राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

Accident Raj Thackeray राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

Surajya Digital
Last updated: 2022/04/30 at 6:49 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

अहमदनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबादला जात असताना अहमदनगरच्या घोडेगाव नजीक 3 गाड्या एकमेकांना धडकल्या आहे. या गाड्यांमध्ये अभिनेते अंकुश चौधरी आणि केदार शिंदे यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. Accident of vehicles in Raj Thackeray’s convoy

30 ते 40 गाड्यांचा ताफा घेऊन राज  ठाकरे औरंगाबादकडे येत होते.  मागील बाजूला असलेल्या तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. यामध्ये कोणीही जखमी नाही. अभिनेते केदार शिंदे, आणि अंकुश चौधरी या वाहनांतून प्रवास करीत होते. त्यांच्या गाडीच्या बोनेटचे किरकोळ नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. समोरच्या गाड्यांनी ब्रेक मारल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाडी एकमेकांवर आदळल्या. राज ठाकरेंच्या गाडीसह अनेक गाड्या पुढे होत्या, तर काही गाड्या पाठीमागून येत होत्या. ताफा न थांबता औरंगाबादकडे रवाना झाला आहे. गाड्या एकमेकांवर आदळल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले. यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते अंकुश चौधरी यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या म्हणजेच 1 मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभा होणार आहे. आज सकाळी पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे औरंगाबादकडे निघाले. त्यांच्यासोबत 30 ते 40 गाड्यांच्या ताफा आहे. या ताफ्यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते अंकुश चौधरी यांच्या गाड्यांचाही समावेश आहे. दरम्यान, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे सुखरूप असून, त्यांच्या मर्सिडीज गाडीचे नुकसान झाले आहे. काळजी करण्याचं कारण नसल्याचे अंकुशने माध्यमांना बोलताना सांगितले.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली होती. राज्य सरकारला 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरावेत, असा अल्टीमेटम राज ठाकरेंनी दिला होता. त्यातच आता दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, असं म्हणत राज ठाकरेंच्या सभेविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे नमूद करत फेटाळून लावली.

दरम्यान, नगरध्ये राज ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अशी घोषणा दिल्या. ताफा चौकात आला त्यावेळी खांबावर आधीच बसविण्यात आलेल्या भोंग्यावरून हनुमान चालिसा लावण्यात आली होती.

 

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

TAGGED: #Accident #vehicles #RajThackeray's #convoy #ankushchouhari, #राजठाकरे #ताफा #गाड्यांचा #अपघात #केदारशिंदे #अंकुशचौधरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Ajit pawar / mohol सोलापूर : बँका, कारखाने नीट चालवा, प्रत्येक ठिकाणी पवार येणार नाहीत – अजित पवार
Next Article Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?