Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात अपहरणाचा कट उधळला, सांगली – बेळगावमधून आरोपी अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात अपहरणाचा कट उधळला, सांगली – बेळगावमधून आरोपी अटक

Surajya Digital
Last updated: 2022/01/03 at 10:19 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

अक्कलकोट : धोत्री (ता.द.सोलापूर ) येथून पाच लाख रुपयाच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या आठ वर्षाच्या मुलाला वळसंग पोलिसांनी आज सुखरूपपणे नातेवाईकांच्या ताब्यात दिले. अपहरण करणाऱ्या पाच आरोपींना सांगली व बेळगावमधून पोलिसांनी अटक केली.

धोत्री येथील बसस्थानकावरून इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या पृथ्वीराज सुरेश बिरादार या मुलाचे गुरुवारी ( ३० डिसेंबर ) सकाळी साडेसहाच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. त्याच दिवशी वळसंग पोलिस ठाण्यात कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून मुलाचे अपहरण केल्याची फिर्याद देण्यात आली होती.

त्यांच्या मुलाच्या शोधासाठी वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी पाच टीम तयार करून विविध ठिकाणी तपासासाठी पाठविले.

मुख्य आरोपी संतोष धोंडप्पा शेडशाळ ( वय २७  रा.  किर्लोस्करवाडी, पलूस जिल्हा सांगली), सराफ व्यवसायिक रमेश भीमगोंडा बिरादार (वय ३८ , रा. हल्लुर तालुका मडोलगी जिल्हा बेळगाव), नितीन उर्फ चार्ली धोंडप्पा शेडशाळ (रा. बाबानगर ता. तिकोटा जि. विजापूर सध्या राहणार रामानंद नगर नलावडे मळा पलूस जिल्हा सांगली),  लक्ष्मण किसन चव्हाण (वय २७ , रा. लऊळ, ता. माढा, जिल्हा सोलापूर) व‌ केदार बाळासाहेब शिवपुजे (वय २०, राहणार कुंडल हायस्कूल रोड ता. पलूस जि. सांगली) यातील अपहरण झालेला मुलगा कुंडल सांगली येथे आरोपी केदार बाळासाहेब शिवपुजे याच्याकडे मिळाला. या अपहरणातील पाचही आरोपींना कुंडल ( सांगली), पलूस (सांगली) व हल्लूर बेळगाव येथून ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपींनी पाच लाख रूपयांची खंडणी उकळण्याचे उद्देशाने सदर मुलाचे अपहरण केले असल्याची कबुली दिलेली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी प्रभारी अधिकारी अतुल भोसले व तपास पथकांनी केलेल्या तपासचे कौतुक केले. तसेच धोत्री ग्रामस्थांनी पोलीसांचा सत्कार करून कौतुक केले. अटक केलेल्या आरोपींना उद्या अक्कलकोटच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

■ सराईत गुन्हेगाराचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

बार्शी : अनेक गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराकडून जामीनावर मुक्तता झाल्यास तशाच प्रकारचे गुन्हे घडण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष नोंदवित अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी माणिक गुलाब काळे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

तालुका पोलिस ठाण्याने त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यात माणिक काळे यास  11 ऑक्टोंबर रोजी अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. महावितरणच्या विद्युत वितरण प्रणालीतील तालुक्यातील शेलगाव शिवारातील 24 खांबा दरम्यानची सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीची ऍल्युमिनियमची तार चोरीस गेली असल्याचे दि. 16 जुलै रोजी उघडकीस आले होते. त्यामुळे आगळगाव भागातील प्रधान तंत्रज्ञ सरिता गोविंद शेळके यांनी त्याबाबत तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती.
त्याचप्रमाणे बीएएनएलच्या आगळगाव येथील टॉवरला बसविलेल्या वापरत्या 44 व न वापरत्या 22 अशा सुमारे दोन लाख रुपये किंमतीच्या 66 बॅटर्‍यांची चोरी झाली होती. त्यामुळे याप्रकरणी सुजित चांगदेव चौधरी या तंत्रज्ञाने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यांचा तपास करताना काळे पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या चौकशीत या गुन्ह्यांची उकल झाली. त्याच्याकडून 200 किलो ऍल्युमिनियम तार जप्त करण्यात आली. त्याच्याविरोधात आणखी 8 ते 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे. त्यामुळे तो सराईत गुन्हेगार असल्याने त्यास जामीनावर मुक्त करण्यास अभियोग पक्षाने विरोध केला होता. तो ग्राह्य धरुन न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Kidnapping #plot #foiled #Solapur #accused #arrested #Sangli #Belgaum, #सोलापूर #अपहरण #कट #उधळला #सांगली #बेळगाव #आरोपी #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी भारत सासणे
Next Article भाजपचे विधानपरिषदेतील आमदार आर एन सिंह यांचं निधन

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?