Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरातल्या शिवसेनेच्या माजी मंत्र्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरातल्या शिवसेनेच्या माजी मंत्र्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2023/02/16 at 5:49 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

पुणे /सोलापूर : शिवसेनेचे माजी क्रीडामंत्री उत्तम खंदारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Uttam Prakash Khandare accused of raping former Shiv Sena minister from Solapur in Pune लग्नाचे आणि मुलाचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवत पुण्यातील शासकीय विश्रामगृहात बोलावून चाकूचा धाक दाखवला व बलात्कार केला, असा एका महिलेने त्यांच्यावर आरोप केला आहे. महिला पळून जाऊ नये म्हणून तिला विवस्त्र करण्यात आले व बेल्टने मारहाण करण्यात आल्याचेही त्या महिलेने तक्रारीत म्हटले.

 

माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्या विरुद्ध पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका 37 वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उत्तम प्रकाश खंदारे (वय 65, रा. सोलापूर), त्यांचे साथीदार महादेव भोसले, बंडु दशरथ गवळी (रा. सोलापूर) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

 

□ अकरा वर्षानंतर पीडितेची पोलिसांकडे धाव

 

हा प्रकार बी रेस्ट हाऊस व बिबवेवाडीत 2012 पासून ते आतापर्यंतच्या काळात घडला आहे. अकरा वर्षानंतर महिलेने याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. खंदारे यांनी मुलाचा सांभाळ करतो, असे सांगून लग्नाचे आमिष दाखवत महिलेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. तर मुलाच्या संगोपनासाठी दिलेले चेक वटले नाही. तसेच महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

□ युतीमध्ये होते दोन खात्याचे मंत्री

 

उत्तमप्रकाश खंदारे हे तत्कालीन शिवसेना भाजप युतीमध्ये सामाजिक न्याय तथा क्रीडा मंत्री होते. तसेच उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून गेले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम खंदारे याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले व फिर्यादीचे मुलाचा सांभाळ करतो, असे भासवले. बी रेस्ट हाऊस येथे फिर्यादीला बोलावले. त्यांना चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी नकार दिला, तरी त्यांनी पट्ट्याने मारहाण करत त्यांच्यावर बलात्कार केला. याच दरम्यान फिर्यादींनी एका मुलाला जन्म दिला आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

□ पीडितेला दिलेले चेक बाऊन्स

मुलाच्या संगोपनासाठी खंदारे यांनी आर्थिक तरतुद म्हणून चेक दिले. परंतु, ते चेक वटले नाही. तेव्हा फिर्यादी यांनी ही बाब त्यांना सांगितल्यावर त्यांनी व इतरांनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी आता जीवाच्या भितीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

 

फिर्यादी महिला या उत्तम खंदारे यांच्याकडे काम करत होत्या. त्यातून त्यांचा परिचय झाला होता. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर त्यांनी याबाबत बिबेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या चौकशीअंती खंदारे आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे असल्याचे संगिता जाधव (वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिबवेवाडी) यांनी सांगितले.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #UttamPrakashKhandare #accused #raping #former #ShivSena #minister #Solapur #Pune, #सोलापूर #शिवसेना #माजीमंत्री #पुणे #बलात्कार #गुन्हा #उत्तमप्रकाशखंदारे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन अकलूज – पंढरपूरमार्गे धावणार, कसा असेल मार्ग वाचा
Next Article शिवजयंती पाळणा कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांसाठी महापालिकेकडून मोफत बस सेवा

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?