Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो, रेणू शर्मावर कारवाई करावी – चित्रा वाघ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राज्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो, रेणू शर्मावर कारवाई करावी – चित्रा वाघ

Surajya Digital
Last updated: 2021/01/22 at 8:24 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या गायिका रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. हा सगळा प्रकार धक्कादायक असल्याचं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करुन ते मागे घेतल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, असे म्हणत रेणू शर्मा यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीसुद्धा चित्रा वाघ यांनी आज केली आहे. हे सगळं धक्कादायक, रेणू शर्मांवर कारवाई करा

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. विरोधीपक्ष भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या प्रकरणामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यातच रेणू शर्मा यांनी आपली तक्रार अचानकपणे मागे घेत हा आमचा कौटुंबिक वाद असल्याचं सांगितलं आहे.

मात्र, शर्मा यांच्या तक्रार मागे घेण्यामुळे भाजप नेत्या यांनी रेणू शर्मा यांना धारेवर धरत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आमच्यासाठी धक्कादायक होते. त्याबरोबरच रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली तेही माझ्यासाठी धक्कादायक आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. बलात्कारासारखा गंभीर आरोप करून तो पुन्हा मागे घेणे हा काही खेळ नाही. अशा घटनांमुळे राज्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

यावेळी बोलताना बलात्कारासारखी तक्रार करुन ती मागे घेणे हा गंभीर प्रकार असल्याचं भाजप चित्रा वाघ म्हणाल्या. अशा प्रकारामुळे खऱ्या बलात्कार पीडितेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही वाघ म्हणाल्या. तसेच यावेळी बोलताना वाघ यांनी रेणू शर्मांवर कारवाई करावी अशी आग्रही मागणी केली.

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

TAGGED: #राज्यात #चुकीचा #संदेश #जाऊशकतो #रेणूशर्मावर #कारवाईकरावी #चित्रावाघ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पतीच्या शुक्राणूंवर फक्त पत्नीचाच हक्क, उच्च न्यायालयाचा निर्णय
Next Article ‘राज्यात ठाकरे अन् पवारांचा दबाव, विरोधात कुणीही बोलू शकत नाही’

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?