Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरात ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्याचे अर्धशतक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर शहरात ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्याचे अर्धशतक

Surajya Digital
Last updated: 2022/09/25 at 7:50 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》सोलापूर जिल्ह्यात लम्पीबाधित सात जनावरांचा मृत्यू, माळशिरस संवेदनशील

सोलापूर : सोलापूर शहरात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा हळूहळू वाढत आहे. महापालिकेच्या आज रविवारच्या अहवालानुसार शनिवारी  ७  रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आता सक्रिय रुग्णांची एकूण संख्या देखील अर्धशतक पार झाली असून  ती 52 वर पोहोचली आहे. Half a century of active corona patients in Solapur city

 

दरम्यान, सोलापूर शहरातील रुग्ण संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग पुन्हा एकदा उपाययोजनासाठी कामाला लागले आहे. शहरात आत्तापर्यंत ६ लाख १९ हजार ६४४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ३४ हजार ४१४ जण बाधित आढळून आले आहेत. तर यामधील १ हजार ५१२ रुग्णांचा बळी गेला आहे.

 

सोलापूर शहर कोरोनामुक्त होऊन सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आल्याचे समाधान व्यक्त होत असतानाच पुन्हा गेल्या दोन महिन्यात मोठी नसली तरी हळूहळू वाढली आहे. रविवारच्या अहवालानुसार  शनिवारी दिवसभरात २४१ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यामध्ये २ पुरुष आणि ५ महिला असे ७ जण बाधित आढळून आले . तर रुग्णालयात उपचार घेत असलेला एक जण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे.

 

आता शहरातील ५२ सक्रिय रुग्णापैकी विविध रुग्णालयात १४ तर ३८ जणांवर घरात विलगीकरण करून उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये २५ पुरुष तर २७ स्त्री रुग्ण आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》सोलापूर जिल्ह्यात लम्पीबाधित सात जनावरांचा मृत्यू, माळशिरस संवेदनशील

 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात लम्पी या संसर्गजन्य आजाराने बाधित असलेल्या सात जनावरांचा मृत्यू झाला असून सध्या १११ बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुपालकांत चिंतेचे वातावरण आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

 

मृत सात जनावरांमध्ये चार बैल तर तीन गायींचा समावेश आहे. यामध्ये सांगोला तालुक्यातील महूद (एक) शिवणी (एक), उत्तर तालुक्यातील कवठे (एक), देगाव (एक), माढा तालुक्यातील ढवळस (एक), माळशिरस तालुक्यातील तिरखंडी (एक), पंढरपूर तालुक्यातील कानापुरी (एक) अशा सात मृत जनावरांचा समावेश आहे.

 

 

माळशिरस तालुक्यात या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. येथे ५६ जनावरांना लम्पी झाला असून उपचार सुरू आहेत. सांगोला (११), माढा (आठ), बार्शी (एक), पंढरपूर (पाच), उत्तर सोलापूर (२९) जनावरांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात ८७ हजार जनावरांचे लसीकरण झाले आहे. तर दोन लाख २६ हजार लस पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध आहे.

 

सोलापूर जिल्ह्यात लम्पी या आजाराचा संसर्ग जनावरांमध्ये वाढत असल्याने लस, औषधे तसेच इतर साहित्य खरेदी करण्यासाठी म्हणून शासनाने जिल्हा नियोजनातून एक कोटी रुपये निधी रक्कम मंजूर केला आहे. तर जि.परिषदेच्या सेसमधूनही ७६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

 

You Might Also Like

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

सोलापूर : ऑपरेशन सिंदूरसाठी शेकडो महिलांचा कुंकुमार्चन सोहळा

उजनी धरणात ६ टीएमसी पाणी

अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस मजबूत – खा. प्रणिती शिंदे

सोलापुरात पाऊस अन्‌ दमटपणा कोकणासारखाच

TAGGED: #Halfcentury #active #corona #patients #Solapur #city, #सोलापूर #शहर #ऍक्टिव्ह #कोरोना #रुग्ण #संख्या #अर्धशतक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article साखर सम्राटांचा ‘भाव’ वाढवला, आता ऊस ‘दर’ वाढवणार का ?
Next Article माळशिरसमध्ये तीन दिवस बिबट्या म्हणून घातला धुमाकूळ, पण निघाला दुसराच प्राणी

Latest News

राज्यात मान्सूनचं आगमन; पुढील ६-७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
Top News May 28, 2025
अमेरिकेत शिक्षणासाठी विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी
देश - विदेश May 28, 2025
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
महाराष्ट्र May 28, 2025
देशात कोरोनाचे १०४७, तर राज्यात ६६ नवीन रुग्ण
महाराष्ट्र May 28, 2025
कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंटमुळे अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू
महाराष्ट्र May 28, 2025
मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; बॅगेत सापडली चिठ्ठी
महाराष्ट्र May 28, 2025
राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
महाराष्ट्र May 28, 2025
शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर बसणार महागाईची झळ
महाराष्ट्र May 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?