Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर उतरून काम करावे – चंद्रकांत पाटील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर उतरून काम करावे – चंद्रकांत पाटील

admin
Last updated: 2025/05/30 at 4:55 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुणे, 30 मे, (हिं.स.)। विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज दिल्या. तसेच, मोर्चा आणि आघाडीची कार्यकारिणी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही पाटील यांनी यावेळी दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी आज कसबा विधानसभा मतदारसंघाचा प्रवास करुन; नवनियुक्त मंडल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर विष्णू कृपा कार्यालयात विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आ. हेमंत रासने, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी नगरसेवक गणेश बिडकर, शैलेश टिळक, स्वरदा बापट, राघवेंद्रबापू मानकर, राजेंद्र काकडे, प्रमोद कोंढरे, दीपक पोटे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला पाटील यांनी भाजपा संघटन पर्वाअंतर्गत पक्षाची कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडलातील आघाड्या-मोर्चाच्यांची कार्यकारिणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर उतरून काम केले. त्यामुळे ना-भूतो-ना भविष्यती विजय मिळाला. आगामी महापालिका निवडणुकीत ही आपल्याला तसेच यश मिळवायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना दिल्या.

ते पुढे म्हणाले की, महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करु नये. आपल्याला मिळालेली जबाबदारी योग्य पार पाडावी, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आपापल्या भागावर विशेष लक्ष केंद्रित करावे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय ठेवावा. जेणेकरून, आणीबाणीच्या प्रसंगातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्याचा फायदा होईल.

You Might Also Like

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेत श्रद्धा चरखचे यश
Next Article दोन शहीद भारतीय जवानांचा संयुक्त राष्ट्रांकडून सन्मान

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?