Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभिनेत्री आलिया भटची 77 लाखांनी फसवणूक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

अभिनेत्री आलिया भटची 77 लाखांनी फसवणूक

admin
Last updated: 2025/07/09 at 3:21 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

माजी पर्सनल असिस्टंटला बंगळुरू येथून अटक

मुंबई, 9 जुलै (हिं.स.) : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटची माजी पर्सनल असिस्टंट वेदिका प्रकाश शेट्टी हिला जुहू पोलिसांनी बंगळुरूहून अटक केली आहे. वेदिकावर आलियाची प्रोडक्शन कंपनी इटरनल सनशाइन प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या पर्सनल अकाऊंटमधून तब्बल ७६,९०,८९२ चा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप आहे.मे २०२२ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान ही फसवणूक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आलियाची आई आणि प्रोडक्शन हाऊसच्या संचालक सोनी राजदान यांनी २३ जानेवारी २०२५ रोजी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदिका शेट्टीने २०२१ मध्ये आलिया भटची पर्सनल असिस्टंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि २०२४ पर्यंत या पदावर राहिली. या काळात तिला आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक अधिकार देण्यात आले होते. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, वेदिकाने बनावट बिलं बनवली आणि आलियाला त्यावर स्वाक्षरी करायला लावली. हे खर्च आलियाच्या प्रवास, मीटिंग्स आणि इतर कार्यक्रमांशी संबंधित आहेत असं खोटं सांगून ती अभिनेत्रीची सतत दिशाभूल करायची.

तिने ऑनलाईन टूल्सचा वापर करून प्रोफेशनलपणे ही बिलं डिझाईन केली, जेणेकरून ती खरी वाटतील. आलियाने या बिलांवर स्वाक्षरी केल्यानंतर, संबंधित रक्कम एका जवळच्या मित्राच्या खात्यात ट्रान्सफर केली जायची. मित्र नंतर सर्व पैसे वेदिकाला परत करायचा. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर, वेदिका शेट्टी फरार झाली आणि सतत तिचं लोकेशन बदलत राहिली. ती सर्वात आधी राजस्थान, नंतर कर्नाटकमध्ये, नंतर पुणे आणि शेवटी बंगळुरूला पोहोचली. जुहू पोलीस पथकाने तिला बंगळुरूहून तिला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येणे धोकादायक – सीडीएस अनिल चौहान
Next Article गुजरात : आणंद -बडोदा दरम्यानचा पूल कोसळला; ३ मृत्यू, बचावकार्य सुरू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?