Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन

admin
Last updated: 2025/06/28 at 4:15 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 28 जून (हिं.स.) : “कांटा लगा’ या रिमिक्स गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री, मॉडेल शेफाली जरीवालाचे शुक्रवारी रात्री निधन झाले. मृत्यूसमयी ती 42 वर्षांची होती. शेफालीची रात्री उशिरा प्रकृती खालावली आणि तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. तिच्या पश्चात पती पराग त्यागी आणि नातेवाईक असा परिवार आहे.

शेफाली जरीवालाला शुक्रवारी रात्री ह्रदयविकाराचा झटका आला. तिचा पती पराग त्यागी आणि त्याचे 3 मित्र शेफालीला घेऊन खासगी रुग्णालयात पोहोचले. मात्र, तोवर तिची प्राणज्योत मालवली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शेफालीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. रात्री अकराच्या सुमारास शेफालीला ह्रदविकाराचा झटका आल्याचे पत्रकार विकी लालवानी यांनी इन्स्टाग्राममधील पोस्टमध्ये म्हटले आहे. शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

शेफालीच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. गायक मिका सिंगने शेफालीच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे, असं म्हणत श्रद्धांजली अर्पण केली. अभिनेत्री स्नेहा उल्लालनेही हे धक्कादायक आहे, या वर्षी काय काय घडतंय असं म्हटलंय. तर भोजपूरी अभिनेत्री मोनालिसानेही आश्चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

शेफाली जरीवाला मूळची गुजरातची असून तिचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी अहमदाबाद येथे झाला होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना शेफाली महाविद्यालयाबाहेर थांबली होती. यादरम्यान एका दिग्दर्शकाने तिला बघितले आणि काटा लगा या रिमिक्स गाण्याची ऑफर दिली. त्यानंतर 2002 मध्ये कांटा लगा हे रिमिक्स गाणं आलं आणि अवघ्या काही दिवसांमध्ये शेफाली जरीवाला हे नाव घरोघरी पोहोचलं. शेफालीने वयाच्या 19 व्या वर्षी हे गाणं केलं होतं. यानंतर शेफाली प्रकृतीच्या कारणास्तव, वैयक्तिक आयुष्यात चढउतार यामुळे सिनेसृष्टीपासून लांब राहिली.

शेफालीने 2004 मध्ये हरमित सिंगशी लग्न केले होते. मात्र, 2009 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. ‘घटस्फोटामुळे माझ्या आयुष्यात बदल झाले. तुम्ही कमी वयात लग्न करता आणि घटस्फोटही होतो. याचा परिणाम म्हणजे माझा प्रेमावरचा विश्वास उडाला होता. या कठीण काळात माझ्या कुटुंबाने, मित्राने साथ दिली’, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर तिने पराग त्यागीशी दुसरे लग्न केले होते.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात
Next Article तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?