Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माजी खासदार, ‘लेडी अमिताभ’ विजयशांती भाजपमध्ये
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

माजी खासदार, ‘लेडी अमिताभ’ विजयशांती भाजपमध्ये

Surajya Digital
Last updated: 2020/12/07 at 7:37 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली :  80 च्या दशकातील दक्षिणेतील सुपरस्टार आणि ‘लेडी अमिताभ’ आणि माजी खासदार विजयाशांती यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विजयाशांती या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा स्वगृही परतल्याने दक्षिण भारतात भाजपची ताकद वाढणार असल्याचं सांगण्यात येतं.

ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी केल्यानंतर विजयाशांती यांनी घरवापसी केली आहे. या आधी काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री खुशबू यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. एकीकडे सुपरस्टार रजनीकांत यांनी सक्रिय राजकारण करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच विजयाशांती आणि खुशबू सारख्या एकेकाळच्या दक्षिणेतील सुपरस्टार राहिलेल्या अभिनेत्रींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपचं बळ वाढलं आहे.

विजयाशांती यांनी 2014 मध्ये टीआरएसचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र काँग्रेसमधील वागणुकीवरून त्या समाधानी नव्हत्या. या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. विजयाशांती यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे.

1996 मध्ये विजयाशांती यांनी अखिल भारतीय अन्ना द्रविड मुनेत्र कळघमला पाठिंबा दिला होता. यावेळी त्यांनी एआयएडीएमकेच्या नेत्या जयललिता यांच्यासाठी प्रचारही केला होता.  मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी जानेवारी 2009 मध्ये राजकीय पक्षाची स्तापना केली होती. ‘तल्ली तेलंगना’ नावाने स्थापन केलेल्या या पक्षाला लोकांचा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी टीआरएसमध्ये हा पक्ष विलिन केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* भाजपमधूनच राजकारणात एंट्री

दक्षिणेतील लेडी अमिताभ म्हणून सुपरिचित असलेल्या विजयाशांती यांनी 1997 मध्ये भाजपमधूनच राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र, स्वतंत्र तेलंगनाच्या आंदोलनाने जोर धरल्यानंतर त्या टीआरएस प्रमुख केसीआर यांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी थेट टीआरएसमध्ये प्रवेश केला होता.

* ‘लेडी अमिताभ’ म्हणून ओळख

1990 च्या दशकात त्या फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होत्या. त्याकाळात एका सिनेमासाठी त्या एक कोटी रुपये मानधन घ्यायच्या. 1990 मध्ये ‘कर्तव्यम’ या तेलुगू सिनेमात त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची जबरदस्त भूमिका केली. या भूमिकेसाठी त्यांनी पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. हा चित्रपट नंतर हिंदीतही डब करण्यात आला होता. त्यानंतर विजयाशांती यांना ‘लेडी अमिताभ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तिन्ही भाषेतील अनेक सुपरस्टार्ससोबत त्यांनी काम केलं.

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #माजीखासदार #लेडीअमिताभ #विजयशांती #भाजपमध्ये, actress -Vijayashanthi -joined- BJP
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्र सरकारचा 2 हजाराचा सातवा हफ्ता गुरुवारपासून खात्यावर होणार जमा
Next Article शेतक-यांचा ‘भारतबंद’ला पाठिंबा नाही, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?