Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: होळी, रंगपंचमी, धुलवड सणाला प्रशासनाचा चाप, कोरोनाचे सुधारित आदेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

होळी, रंगपंचमी, धुलवड सणाला प्रशासनाचा चाप, कोरोनाचे सुधारित आदेश

Surajya Digital
Last updated: 2021/03/25 at 10:07 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढत आहे. यमुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज गुरुवारी सुधारित आदेश काढले आहेत. सोलापूर पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळून ग्रामीण भागासाठी हा आदेश काढला आहे.

या आदेशातून अत्यावश्‍यक सेवा आणि मनुष्य व प्राणी मात्रासाठी जीवनावश्‍यक वस्तू, भाजीपाला व फळे, किराणा दूध व वृत्तपत्र वितरण या बाबींना या आदेशातून सुट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या या सुधारित आदेशानुसार आता जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात या वेळेत चालू राहणार आहे. होळी, रंगपंचमी, धुलवड सणाला प्रशासनाने चाप लावला आहे. कोरोनाचे सुधारित आदेश जारी केले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडे व बाजार जनावरांचा बाजार बंद करण्यात आले आहेत. खाद्यगृह, परमिट रूम व बार फक्त सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत कोव्हिडच्या नियमांचे पालन करून ५० टक्केच्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

होम डिलिव्हरीसाठी किचन व वितरण कक्ष रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिम, व्यायाम शाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स, खेळाची मैदाने, जलतरण तलाव हे वैयक्तिक सरावासाठी सुरू राहणार आहेत. सर्व प्रकारची धार्मिक स्थळेही सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहतील. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांच्याकडे लिलावासाठी येणाऱ्या कृषी मालाच्या प्रकारानुसार नियोजन करावे. एका दिवशी, एकाच वेळी लिलाव न करता शेत मालाच्या प्रकारानुसार लिलावाचा दिवस व वेळ विभागून द्यावी अशी सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली आहे. बाजार समित्यांमधील लिलावाच्या नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांवर सोपविण्यात आली आहे.

* असा आहे आदेश, ३१ मार्चपर्यंत लागू

– प्रत्येक शनिवार आणि रविवार सर्व दुकान बंद
– दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतच दुकान सुरु राहतील
– सोलापूर शहरात हा आदेश उद्या पासून लागू
– होळी, रंगपंचमी, धुलवड. सार्वजनिक स्वरुपात करता येणार नाही..

– सोलापूर शहरात संचार बंदीचा कालावधी आहे तोच म्हणजे रात्री ११ ते पहाटे ५पर्यंत राहील

– सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर ग्रामीण हद्दीत आज पासून नवीन आदेश काढले आहेत..
– यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण भागातील दुकान आता सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील. शनिवार-रविवारी दुकान पूर्णपणे बंद राहतील. हॉटेल ,बार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील.

हॉटेलला रात्री दहा वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करता येईल. आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहतील .

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Administration #pressure #Holi #Rangpanchami #Dhulwad #festival, #होळी #रंगपंचमी #धुलवड #सणाला #प्रशासनाचा #चाप #कोरोनाचे #सुधारित #आदेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
Next Article महिला शिक्षिकेच्या फुफ्फुसात आढळला कंडोमचा तुकडा, डॉक्टरही हैराण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?