Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर | प्रसाद खाल्ल्याने 137 भाविकांना त्रास, रुग्णालयात दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपूर | प्रसाद खाल्ल्याने 137 भाविकांना त्रास, रुग्णालयात दाखल

Surajya Digital
Last updated: 2023/02/02 at 5:21 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्षस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

 

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे काल गुरुवारी (ता. 1 फेब्रवारी) सकाळी माघी एकादशीचा प्रसाद खाल्ल्याने 137 जण आजारी पडले. या सर्वांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Pandharpur | 137 devotees suffer from eating prasad, admitted to hospital, food and drug administration neglects

 

माघी एकादशी असल्यामुळे भाविकांनी भगर आणि आमटी खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची घटना पंढरपूर मध्ये घडली आहे. कार्तिकी वारीला देखील असाच प्रकार घडला होता मात्र अन्न आणि औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये बुधवारी लाखो भाविक आले होते. माघी एकादशीनिमित्त या सर्वांनी बुधवारी उपवास केला. रात्री उशिरा या लोकांनी प्रसाद खाऊन उपवास सोडला होता, मात्र गुरुवारी सकाळी 137 जणांना त्रास होऊ लागला. या लोकांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

सर्व रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती उपजिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेशकुमार माने यांनी दिली. कोणत्याही रुग्णाची प्रकृती चिंताजनक नाही. या घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी घटनास्थळी पाहणी करून प्रसादाचा नमुना घेतला.

माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी एकादशी दिवशी भगर अन् आमटी खाली. त्यामुळे त्यांना विषबाधा झाली आहे. यामुळे बाधीत झालेल्या १३७ जणांना गुरुवारी पहाटे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

माघी वारीसाठी नांदेड आणि हिंगोली भागातील भाविक दिंडीतून चालत आले होते. यंदा माघी यात्रा सोहळा साजरी करण्यासाठी दिंडी ३१ जानेवारी रोजी पंढरपुरात आले. त्यांनी पंढरपुरातील संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये मुक्काम केला. त्या भाविकांनी एकादशीच्या उपवासामुळे बुधवारी भगर अन् आमटी खाली. परंतु त्यांना गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास मळमळ, उलट्या व चक्करचा त्रास सुरू झाला. ही माहिती मिळताच त्या ठिकाणी १०८ रुग्णवाहिका पोहचली. बाधीत झालेल्या १३७ जणांना गुरुवारी पहाटे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आहे. 137 पैकी 4 रुग्ण ऍडमिट आहेत. बाकी 133 भाविकांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे.

ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण फुगे, सपोनि केंद्रे दाखल झाले. तसेच उपजिल्हा अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कूचेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. अन्न औषध प्रशासनाने विषबाधा झालेल्या अन्न पदार्थांचे नमुने ताब्यात घेतले आहे. वारी कालावधीमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे वारंवार दिसून येत आहे. पंढरपुरात वारी कालावधीत असणारी हॉटेल्स तात्पुरती हॉटेल्स खाद्यपदार्थ याची तपासणी अधिकारी करत नसल्याचे निदर्शनाला आले आहे. आज गुरुवारी सकाळी प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेलेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली.

 

 

“उपजिल्हा रुग्णालय १३७ भाविक उपचारासाठी आले होते. त्यापैकी केवळ 4 भाविकांवर उपचार सुरू आहेत. चारही भाविकांची प्रकृती स्थिर आहे. विषबाधा झाल्याचे समजतात पहाटे दोनच्या सुमारास 22 डॉक्टरांची टीम उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत होती”

– महेशकुमार माने,
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर

 

 

 

You Might Also Like

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

TAGGED: #Pandharpur #devotees #suffer #eating #prasad #admitted #hospital #foodanddrug #administration #neglects, #पंढरपूर #प्रसाद #खाल्ल्याने #137 #भाविक #त्रास #रुग्णालय #दाखल #अन्न #औषध #प्रशासन #दुर्लक्ष
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बाळे खंडोबा मंदिराचा वाद जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात
Next Article सत्यजित तांबेंनी बाजी मारली… मोठी आघाडी, निकालाअगोदरच झळकले विजयाचे पोस्टर

Latest News

कपिल शर्माच्या हॉटेलवरील हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात
देश - विदेश July 11, 2025
अमेरिकेकडून लेखी हमी मिळेपर्यंत अणु चर्चा नाही -इराण
देश - विदेश July 11, 2025
गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित
देश - विदेश July 11, 2025
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?